भोयगाव मार्गावरील कचरा डेपोमुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:13+5:302021-01-01T04:20:13+5:30

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत ...

Stink due to garbage depot on Bhoygaon road | भोयगाव मार्गावरील कचरा डेपोमुळे दुर्गंधी

भोयगाव मार्गावरील कचरा डेपोमुळे दुर्गंधी

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गाईचा मृत्यू झाला होता. जनावरांमुळे दुचाकी वाहनांचे अपघात झाले आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.

ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत

भद्रावती : तालुकास्थळाला जोडणाऱ्या ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघात होत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.

भान्सी रस्त्यावर जागोजागी खड्डे

सावली : तालुक्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली. भान्सी रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली.

रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण

मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण, कोरोना संसर्गापासून कारवाई थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.

सिमेंट रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. पण, ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदार हैराण आहेत. काही कामे कासवगतीने सुरू आहे. अधिकाऱ्यांनी निधीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.

विजेच्या लंपडावाने नागरिक त्रस्त

जिवती : परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.

भाजीबाजाराच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : येथील गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारी असलेल्या चौकामध्ये भाजीपाल्याचा कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. महानगरपालिकेने याकडे विशेष लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Stink due to garbage depot on Bhoygaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.