बंदवस्थेतील ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याच्या इमारतीत दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST2020-12-06T04:30:25+5:302020-12-06T04:30:25+5:30
भद्रावती : शहरातील मध्यभागी असलेले ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याची इमारत बंद अवस्थेत आहे. या इमारतीकडे कुणाचे लक्ष नसल्याने नागरिक ...

बंदवस्थेतील ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याच्या इमारतीत दुर्गंधी
भद्रावती : शहरातील मध्यभागी असलेले ब्रिटीशकालीन पोलीस ठाण्याची इमारत बंद अवस्थेत आहे. या इमारतीकडे कुणाचे लक्ष नसल्याने नागरिक लघुशंकेसाठी वापर करत आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
ब्रिटीशकालीन पोलीस ठाणे इमारतीला सुमारे शंभर वर्षे झाले. या शतकात अनेक ठाणेदारानी येथील खुर्चीवर बसून हुकुमत गाजवली आहे. ग्रामीण रुग्णालयासमोर भद्रावतीचे स्मार्ट पोलीस स्टेशन प्रशस्त इमारतीत तयार झाले. दोन वर्षांपासून तेथे कारभार सुरू झाला आहे. मात्र बाजार वार्डातील जुन्या पोलीस स्टेशनकडे या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याच परिसरात नगर परिषदचे दोन सुलभ स्वच्छतागृह आहेत. बाजारात आलेले नागरिक स्वच्छतागृहाचा वापर करण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या परिसरात घाण करतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी आहे. तत्कालीन ठाणेदारांनी स्मार्ट पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतरही जुन्या पोलीस ठाण्याला चौकी करण्याचे जाहीर केले होते. परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटून चौकी व एक शिपाईसुद्धा या परिसरात राहत नाही.
कोट
जुन्या पोलीस ठाण्यात असलेले संपूर्ण साहित्य नवीन ठिकाणी आणण्यात आले. सध्या हा परिसर दुर्लक्षित आहे. दिवसा कुणी कर्मचारी तिकडे जात नाहीत. रात्री या परिसरात पोलिसांची गस्त असते. यापुढे लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुनीलसिंग पवार, ठाणेदार, भद्रावती.