राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:02 IST2018-10-30T23:02:16+5:302018-10-30T23:02:38+5:30
शासनाने आरोग्यावर होणारा खर्च कमी केला. त्यामुळे नागरिकांना उपचाराकरिता वणवण भटकावे लागत आहे. औषधी, डॉक्टर, सोई, सुविधा यांचा अभाव मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : शासनाने आरोग्यावर होणारा खर्च कमी केला. त्यामुळे नागरिकांना उपचाराकरिता वणवण भटकावे लागत आहे. औषधी, डॉक्टर, सोई, सुविधा यांचा अभाव मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे शासकीय रूग्णांलयाची अवस्था बिकट झाली आहे. बालमृत्युदर अनियंत्रित आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, असे प्रतिपादन विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
चिमूर येथे हिलींग टच मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सहउद्घाटक तुकाराम बुटके, विशेष अतिथी म्हणून चिमूर गडचिरोली लोकसभा काँग्रेस युवा नेते डॉ. नितीन कोडवते, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, तालुकाध्यक्ष माधव बिरजे, जिल्हा परीषद गटनेते डॉ. सतीश वारजुरकर, जि. प. सदस्य ममता डुकरे , रमाकांत लोधे, गजानन बुटके, नगराध्यक्ष गोपाल झाडे, चिमूर पंचायत स. सभापती चौधरी, घनश्याम डुकरे, संजय डोंगरे, डॉ. गो. वा. भगत, प्रा. संजय पिठाडे, राजू देवतळे, चुन्नीलाल कुडवे आदी उपस्थित होते.
आ. वडेट्टीवार म्हणाले, नोटबंदीमुळे नव्याने तयार केलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटा आता दुर्मीळ झाल्या आहेत. याबाबत चौकशी केली असता रिजर्व बँकेकडून नोट येणेच बंद झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तर छपाई केलेले दोन हजार रूपयांच्या नोट कुठे गायब झाल्या, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनात या रुग्णालयातून नागरिकांवर योग्य उपचार करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आयोजक बुटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी संचालन व आभार प्रा. राजू दांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला आयोजक बुटके व त्यांचा परिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.