विविध मागण्यांसाठी प्रहारचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:16 AM2021-03-29T04:16:04+5:302021-03-29T04:16:04+5:30

पळसगाव(पिपर्डा) : जिल्हात ठिकठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून ज्या गाड्यांची योग्य व रीतसर कागदपत्रे आहे, अशा ...

Statement to the Superintendent of Police of Prahar for various demands | विविध मागण्यांसाठी प्रहारचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

विविध मागण्यांसाठी प्रहारचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next

पळसगाव(पिपर्डा) : जिल्हात ठिकठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून ज्या गाड्यांची योग्य व रीतसर कागदपत्रे आहे, अशा चारचाकी आणि दुचाकी वाहनधारकांकडून पैशाची मागणी केली जात आहे. यावर प्रशासनाचे कुठलेही लक्ष नाही. याबाबत प्रहार चालक मालक संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक, उपप्रादेशिक कार्यालय चंद्रपूर, जिल्हा वाहतूक शाखा चंद्रपूर यांना निवेदन देऊन हा प्रकार थांबविण्याची मागणी केली.

जिल्हा अध्यक्ष रविंद्र वाकडे, प्रवीण वाघे यांच्या नेतृृत्वात हे निवेदन देण्यात आले.

टॅक्सी, टेम्पो, ट्रॅव्हल्स या गाड्याना स्पेशल परमीट शनिवार व रविवारी मिळत नाही. इतर दिवस एजंटमार्फत जास्त पैसे देऊन काढावे लागते. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. तेव्हा हे परमिट ऑनलाईन करावे, हायवे ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून होणारी लुटमार थांबवावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना हरजितसिंग भौड, अनिल भोयर, रवी वाकडे, प्रदीप लांजेवार, नितीन जुमडे, आशिष कोटकर, विनोद चांदेकर, बबलू शर्मा, रतन सुकारे, तसेच चंद्रपूर, चिमूर, भद्रावती, सिंदेवाही येथील चालक मालक संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Statement to the Superintendent of Police of Prahar for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.