वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन
By Admin | Updated: March 4, 2016 01:04 IST2016-03-04T01:04:44+5:302016-03-04T01:04:44+5:30
एफडीसीएम लिमीटेडच्या कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन स्थानिक चंद्रपूर वनविकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या आॅडीटोरीयम हॉलमध्ये ...

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन
चंद्रपुरात आयोजन : राज्यातील एक हजारांवर कर्मचाऱ्यांचा सहभाग
चंद्रपूर : एफडीसीएम लिमीटेडच्या कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन स्थानिक चंद्रपूर वनविकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनीच्या आॅडीटोरीयम हॉलमध्ये संघटनेचे राज्य अध्यक्ष एम.ए. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून १ हजारपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित होते.
संघटनेचे उपाध्यक्ष आर.एम. मरस्कोल्हे, सचिव आर.पी. बल्लया, रोटे विभागीय अध्यक्ष भंडारा, भावे विभागीय अध्यक्ष मध्य चांदा यांनी सभेत कर्मचाऱ्यांच्या अडचणीवर मनोगत व्यक्त करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मुख्य २० प्रश्नांबाबतचे निवेदन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सादर करून प्रास्ताविक भाषणात सर्व मुद्दे व मुद्याच्या अनुषंगाने सर्व माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. सर्व प्रश्न निकाली काढावे, अशी संघटनेतर्फे विनंती करण्यात आली.
एफडीसीएम लिमीटेडतर्फे मुख्य महाव्यवस्थापक साईप्रकाश यांनी संघटनेने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्न निकाली काढणेबाबत आश्वासन दिले. तसेच महाव्यवस्थापक एम.एस. डोळे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर विस्तृत तपशिल स्वरूपात पुस्तक तयार करून १ महिन्यांपर्यंत संघटनेकडे व मंत्रालयात सादर करावे.
महामंडळाच्या स्तरावरील प्रश्न निकाली काढावेत व मंत्रालयस्तरावरील प्रश्न माझ्याकडे पाठविण्यात यावे, असे निर्देश एफडीसीएमतर्फे उपस्थित असलेले साईप्रकाश यांना दिलेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा सहानुभुतीपूर्वक विचार करून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती केली. कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काबाबत एकसंघ राहून लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ‘एफडीसीएम बचाओ, एफडीसीएम बढाओ’ हा नारा दिला.
अधिवेशनामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस अशोक तुंगीडवार, उपाध्यक्ष एस.पी. बोबडे, आर.के. वाघमारे, आर.एम. मरस्कोल्हे, एम.पी. जोशी, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, सचिव आर.पी. बल्लया, पवन दहागावकर, आर.एफ. लोखंडे, आर.के. टिकले, पी.पी. खुने, डी.जी. मडावी, शेखशम्मी अ. गफूर, एम.एम. ठाकरे, अरविंद सावकारे व सोनी पंधरे उपस्थित होते.
तसेच एफडीसीएम लिमीटेडतर्फे मुख्य महाव्यवस्थापक साईप्रकाश (भावसे), दक्षिण चंद्रपूर प्रदेशचे महाव्यवस्थापक एम.एम. न्युग्ली, उत्तर चंद्रपूरचे महाव्यवस्थापक एस.एस. डोळे, पश्चिम चांदाचे विभागीय व्यवस्थापक एस.बी. पाटील, विभागीय व्यवस्थापक नौकरकर आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)