विसापुरात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २८ फेब्रुवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST2021-02-27T04:38:12+5:302021-02-27T04:38:12+5:30

ही स्पर्धा दोन गटात म्हणजे पुरुष व महिला अशा पद्धतीने आयोजित केली आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची वय १७ ...

State level marathon competition in Visapur on 28th February | विसापुरात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २८ फेब्रुवारीला

विसापुरात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा २८ फेब्रुवारीला

ही स्पर्धा दोन गटात म्हणजे पुरुष व महिला अशा पद्धतीने आयोजित केली आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची वय १७ ते ५० दरम्यान असावे, अशी अट आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार उमेश पाटील, बल्लारपूर नगर परिषद अध्यक्ष हरीश शर्मा, डॉ अमित प्रेमचंद, डॉ राकेश तिवारी, नीरज वर्मा, सुनील भिसडे, विसापूर सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्राम विकास अधिकारी एकनाथ पिंपळशेंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

स्पर्धेत आकर्षक बक्षीस व शील्ड दोन्ही श्रेणीतील स्पर्धकांना देण्यात येणार असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: State level marathon competition in Visapur on 28th February