उमा कुकडपवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:03+5:302021-01-15T04:23:03+5:30
चंद्रपूर : शहरातील मनपाच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उमा सुधीर कुकडपवार यांना लोणावळा येथे पार पडलेल्या सोहळ्यात राज्याच्या ...

उमा कुकडपवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
चंद्रपूर : शहरातील मनपाच्या सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेच्या शिक्षिका उमा सुधीर कुकडपवार यांना लोणावळा येथे पार पडलेल्या सोहळ्यात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, संघटनेचे अध्यक्ष अर्जुन कोळी व अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थी गुणवत्तेविषयी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात त्या सतत पुढे असतात. कोरोना लाॅकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या दारी शिक्षण, शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू अंतर्गत अनेक उपक्रम राबविल्याने शाळेला नावलौकिक मिळवून दिले. या कार्याची दखल घेऊन कुकडपवार यांना राज्यस्तरीय
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.