शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने घरगुती वीज देयक माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 05:00 IST

वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात आले. दोन खोल्या असलेल्या वीज ग्राहकांना पाच बिल आल्याचे निवेदनात नमुद केले आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांची मागणी : महावितरण कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील विविध संघटनांनी घरगुती वीज देयक माफ करण्याची मागणी वीज अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.ब्रह्मपुरी : लॉकडाऊन काळातील थकीत तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या नेतृत्वात महावितरण कंपनीचे ब्रम्हपुरी विभागीय कार्यकारी अभियंतांना सादर करण्यात आले. जून महिन्यात महावितरण कंपनीकडून मार्च ते जून महिन्याचे सरासरी देयक देण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त रकम भरावी लागणार असल्याचा आरोप ओबीसी आघाडीचे अध्यक्ष प्रा. प्रकाश बगमारे, मनोज भूपाल, अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, प्रा.सुयोग बाळबुधे, स्वप्नील अलगदेवे, रेहेमान खान पठाण, अरूण बनकर, अशोक तुडुंलवार, नानाजी गराडे, तनय देशकर, अविनाश मस्के, धीरज पाल, सदाशिव मस्के आदींनी केला आहे.पालकमंत्र्यांना निवेदनघुग्घुस : वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात आले. दोन खोल्या असलेल्या वीज ग्राहकांना पाच बिल आल्याचे निवेदनात नमुद केले आहे.ग्राहक आर्थिक संकटातगांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी परिसरातील ग्राहकांना सरासरी देयक पाठविण्यात आले. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या भागातील नागरिकांची उपजीविका शेतीच्या उत्पन्नावर चालते. त्यामुळे दर महिन्याला वीज बिल भरताना ग्राहकांची दमछाक होत असल्याने देयक माफ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वीज देयक समजून घेण्यासाठी वेबिनारचंद्रपूर : महावितरणने ग्राहकांचे अचूक वीज बिल देण्यासाठी पूर्ण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्यिक वीज ग्राहकांना बिलविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी वसमस्यांचे निराकरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजता महावितरण चंद्र्रपूर परिमंडलाद्वारे ‘आपले वीज बिल समजून घ्या’ या विषयावर आॅनलाईन वेबिनार संवादाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ग्राहकांना सहभागी होऊन आपल्या समस्या मांडता येणार आहे, अशी माहिती चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी दिली आहे.तहसीलदाराला निवेदनवढोली : वीज कंपनीने रविवारपासून वीज देयक वाटपाला सुरवात केली आहे. मात्र, तीन महिन्यांचे एकत्रित देयक भरण्यास आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे देयक माफ करून नागरिबांना दिलासा देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज माडूरवार, अरूण वासलवार, पुरुषोत्तम वाघ, नितेश मेश्राम, आकाश चौधरी,दीपक वांढरे,जयेश खरबनकार,निकेश बोरकुटे,गोलू सिडाम आदींनी तहसीलदाराकडे केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज