शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे मानाचे पान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

स्पर्धेत अभिजात कला सादर होणार आहेत. काही सामाजिक आशयाची नाटके सुध्दा सादर होणार आहे. नाट्यकलेची जोपासना करणाऱ्या सर्व कलावंतांनी गेली अनेक वर्षे परिश्रम घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न केली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ५९ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेली हौशी राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे मानाचे पान आहे. नाटकाची ही कला पारदर्शी कला आहे. या स्पर्धेत अभिजात कला सादर होणार आहेत. काही सामाजिक आशयाची नाटके सुध्दा सादर होणार आहे. नाट्यकलेची जोपासना करणाऱ्या सर्व कलावंतांनी गेली अनेक वर्षे परिश्रम घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक संपन्न केली असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केले.येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५९ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी सुनिल देशपांडे, चित्रपट दिग्दर्शक शैलेश दुपारे, परिक्षक नंदकुमार सावंत (मुंबई), अ‍ॅड. सुजाता पाठक (औरंगाबाद), सुधाकर गीते (अकोला) यांची उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पहिली घंटा वाजवून स्पधेर्चे उद्घाटन केले.यावेळी बोलताना चित्रपट दिग्दर्शक शैलेश दुपारे यांनी स्पर्धेत सादर होणाºया सर्व नाटकांचे अवलोकन करून त्यांच्या आगामी चित्रपटात काही कलावंतांना संधी देण्यात येईल, अशी भूमीका जाहीर केली.संचालन व आभार स्पर्धेचे समन्वयक सुशिल सहारे यांनी केले. उद्घाटन समारंभानंतर वर्धा येथील संघाने सादर केलेल्या ‘रातमतरा’ या नाटकाचे सादरीकरण झाले. या स्पर्धेत ३० नोव्हेंबरर्पंत १२ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. नाट्यगृहात प्रवेशताना सादर होणाºया सर्व नाटकांची माहिती देणारी एक आकर्षक दिवटी व रांगोळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.१२ नाटकांची नाट्यरसिकांना मेजवानीस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण १२ नाटकांचा समावेश असून यामध्ये १९ नोव्हेंबर रोजी अनफेअर डिल, २० नोव्हेंबर त्वचेचिया राना, २१ नोव्हेंबर काली, २२ नोव्हेंबर दुसरा अंक, २३ नोव्हेंबर अम्मी, २६ नोव्हेंबर कातरवेळ, २७ नोव्हेंबर हॅलो राधा मी रेहाना, २८ नोव्हेंबर काय डेंजर वारा सुटलाय, २९ नोव्हेंबर आखेट, ३० नोव्हेंबर मोरूची मावशी आदी नाटकांचा यात समावेश आहे. ही सर्व नाटक सायंकाळी ७ वाजता प्रदर्शीत करण्यात येणार असून याचा रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक