चंद्रपूरच्या स्वागताला स्टार्टअप इंडिया पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:20 IST2018-11-05T22:20:22+5:302018-11-05T22:20:37+5:30
स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे करण्यात आला.

चंद्रपूरच्या स्वागताला स्टार्टअप इंडिया पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे करण्यात आला.
या यात्रेत महाराष्ट्रातील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. ३०९ अंतिम स्पर्धकांमधून इनोव्हेशन सस्टेंनबिलीटी या विभागातून स्वागता प्रशांत कावळे प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा ७५ हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वागता कावळे हिने पर्यावरणाला पूरक इंडिबल कपचा शोध लावला आहे. त्या कपात गरम अथवा थंड पेय टाकून कपासह खाता येऊ शकते. हा कप पूर्णत: बायोडिग्रेडेबल आणि इको-फ्रेंडली आहे.