चांदाफोर्ट ते हावडापर्यंत सरळ रेल्वेसेवा सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:09 IST2019-02-24T23:08:33+5:302019-02-24T23:09:20+5:30

जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्रनाथ बिश्वास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.

Start the train service from Chandafort to Howrah | चांदाफोर्ट ते हावडापर्यंत सरळ रेल्वेसेवा सुरु करा

चांदाफोर्ट ते हावडापर्यंत सरळ रेल्वेसेवा सुरु करा

ठळक मुद्देबंगाली समाजाची मागणी : बंगाली कॅम्प चौकात आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातून हावडा (प. बंगाल) येथे जाण्यासाठी ट्रेन नसल्याने बंगाली भाषिकासह अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चंद्रपूर ते हावडा येथे सरळ जाण्याकरिता रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्व बंगाली समाज एकत्र येत बंगाली कॅम्प चौकात सेवानिवृत्त अधिकारी बिरेंद्रनाथ बिश्वास यांच्या नेतृत्वात आंदोलन केले.
चांदाफोर्टवरून बिलासपूरला एकमात्र रेल्वे सुरू आहे. एकच रेल्वेगाडी असल्याने ती खचाखच भरुन जाते. परिणामी अनेक प्रवाश्यांना उभे राहण्यासाठीसुध्दा जागा उपलब्ध नसते. त्यामुळे या रेल्वेला हावडापर्यंत सुरू करावी, किंवा सरळ हावडासाठी नवीन ट्रेन सुरु करावी, तेव्हाच बंगाली समाजाला तसेच इतरांना सोईस्कर होईल. यासंदर्भात समाजातील शिष्टमंडळानी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री पीयुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, डीआरएम नागपूर आदींना मागील एका वर्षांपूवी निवेदन चांदाफोर्ट ते हावडापर्यंत रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रीत केले होते. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. परिणामी समाजबांधवानी एकत्र येऊन आंदोलन केले.
यावेळी बी. एन. बिश्वास, जि. के. बिश्वास, बापी दत्ता, विवेक करमरकर, सतीष शहा, अमल बजाज, विकास बारई, प्रशांत राय, छाया सरकार, विनोद सरकार, डॉ. चयन बिश्वास, डॉ. सविता बिश्वास, स्वप्न नाग, उत्तम बिश्वास, उत्तम देवनाथ, दिलीप शाहा, प्रणब घरामी, अशोक शाहा, कृष्णकांत शाहा, संतोष देवनाथ आदी उपस्थित होते.
नागपूर गोंदिया हा पर्याय- बिस्वास
चंद्रपूर, गडचिरोली आणि कागजनगरमध्ये हजारोच्या संख्येने बंगाली समाज वास्तव्यास आहे. या सर्वांचे मूळस्थान बंगाल असल्याने त्यांना वारंवार येणे - जाणे करावे लगाते. परिवार, व्यवसायाकरिता बंगाली समाज पश्विम बंगालमध्ये जात असतो. त्यासाठी कलकत्तापर्यंत जाण्यासाठी नागपूर आणि गोंदिया रेल्वेने प्रवास करावा लागतो. अशातच आरक्षण न मिळाल्यास बंगाली समाजाला शारीरिक, मानसिक व आर्थिक परिस्थितीचा सामाना करावा लागत असल्याचे बिस्वास यांनी म्हटले आहे.

Web Title: Start the train service from Chandafort to Howrah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.