चिंचोली (बु) येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्र सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:44+5:302021-04-23T04:30:44+5:30

विरुर स्टे. : राजुरा तालुक्यातील ...

Start the proposed power substation at Chincholi (Bu) | चिंचोली (बु) येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्र सुरू करा

चिंचोली (बु) येथील प्रस्तावित विद्युत उपकेंद्र सुरू करा

विरुर स्टे. : राजुरा तालुक्यातील चिंचोली बुज येथील प्रस्तावित असलेल्या विद्युत उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी भाजपच्या ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष शंकर धनवलकर, सरपंच पिलाजी भोंगळे, उपसरपंच पुष्पांजली धनवलकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकर्‍यांनी विद्युत मंडळाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

* * * *चिंचोली येथे विद्युत उपकेंद्र व्हावे, अशी मागणी असल्याने तत्कालीन युती सरकारने या भागात सात उपकेंद्र मंजूर केले होते. त्यात * * * *चिंचोली केंद्राचा समावेश होता. त्यावेळी केंद्र मंजूर असतानाही ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून न दिल्याने अखेर हे विद्युत उपकेंद्र होऊ शकले नाही. आता २० वर्षांनंतर प्रथमच भाजप व शेतकरी संघटना समर्थित ग्रामपंचायतीत सत्ता निवडून आली आहे. त्यांनी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे ठरवून विद्युत उपकेंद्रांची रितसर मागणी केली आहे. * * * *चिंचोली येथे अनेक वर्षांपासून विजेचा अपुरा पुरवठा होत आहे. येथे विद्युत प्रवाह व विद्युत जोडणी असल्या तरी नेहमी कमी विद्युत दाब असल्याने नेहमी लाईट डिम राहते. गेल्या वर्षभरात अनेक लोकांचे टीव्ही संच, पंखे, ट्यूबलाईट,बल्ब जळून गेले आहेत. त्यामुळे * * *चिंचोली येथील प्रस्तावित विद्युत केंद्र विद्युत विभागाने तातडीने निर्णय घेऊन सुरू करून पुरेशा विद्युत दाबाची वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप ओबीसी आघाडीचे राजुरा तालुकाध्यक्ष व शेतकरी सल्लागार समिती (आत्मा)चे सदस्य शंकर धनवलकर, * * *चिंचोली सरपंच पिलाजी पाटील-भोंगळे, उपसरपंच पुष्पांजली धनवलकर, ग्रा. पं. सदस्या वंदना खोब्रागडे, सरिता हजारे, भास्कर घोडमारे यांनी केली आहे.

Web Title: Start the proposed power substation at Chincholi (Bu)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.