शासकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:36+5:302021-04-22T04:29:36+5:30
किशोर जोरगेवार यांच्या सूचना : महाविद्यालयाला दिली भेट चंद्रपूर : येथील रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा ...

शासकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करा
किशोर जोरगेवार यांच्या सूचना : महाविद्यालयाला दिली भेट
चंद्रपूर : येथील रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. दरम्यान, त्यांनी महाविद्यालयाला भेट देत येथील कामावर लक्ष केंद्रित केले आहे.
चंद्रपुरात कोरोनाने रौद्र रूप धारण केले आहे. आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे आहे. अशात युद्धपातळीवर काम करून आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची गरज असल्याचे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.
येथील रामनगर चौकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहे. येथील व्यवस्थेची पाहणी सातत्याने केली जात आहे. बैठकांच्या माध्यमातून येथील उपाययोजना, संसाधने, मनुष्यबळ याबाबत त्यांच्यावतीने सातत्याने माहिती घेतल्या जात आहे.