मागील दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील बससेवा बंद आहे. ग्रामीण भागात लोकल व मानव विकास मिशन अंतर्गत शालेय व मानव विकास मिशन शालेय विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना ये-जा करण्यास आर्थिक दंडासह मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी ऑटोरिक्षा चालकाकडून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. गोरगरीब ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ब्रह्मपुरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी काही महिन्यांपूर्वी ब्रह्मपुरी आगारात अधिकारी यांना याबाबत निवेदन दिले होते. कारण सिंदेवाही बसस्थानक हे ब्रह्मपुरी आगाराच्या हद्दीत येत असल्याने हे निवेदन देण्यात आले होते. दोन-तीन महिने लोटूनसुद्धा ही समस्या अजूनही जशीच्या तशी असल्याने आता युवक काँग्रेसने पुढाकार घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मध्ये युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील कावळे महेश मंडलवार, सुशांत बोडणे, पंकज उईके, सोनू मंडलवार, मंगेश गुरनुले उपस्थित होते.
ग्रामीण भागात बससेवा सुरळीत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST