अंत्यसंस्कारासाठी तारेवरची कसरत

By Admin | Updated: May 25, 2014 23:26 IST2014-05-25T23:26:46+5:302014-05-25T23:26:46+5:30

तालुक्यातील पारडगाव येथील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर खडीकरणाकरिता ठिकठिकाणी मुरमाचे ढीग टाकण्यात आले आहे. मात्र रस्ता अद्यापही तयार करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कार

Star workout for funeral | अंत्यसंस्कारासाठी तारेवरची कसरत

अंत्यसंस्कारासाठी तारेवरची कसरत

रस्ता नाही : खांद्यावर न्यावी लागतात लाकडे

ब्रह्मपुरी :तालुक्यातील पारडगाव येथील स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावर खडीकरणाकरिता ठिकठिकाणी मुरमाचे ढीग टाकण्यात आले आहे. मात्र रस्ता अद्यापही तयार करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह तसेच सरण रचण्यासाठी लागणारे लाकडे खांद्यावर नेत तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ब्रह्मपुरी शहरापासून तीन किमी अंतरावरील ब्रह्मपुरी-आरमोरी महामार्गापासून एककिमी आतमध्ये पारडगाव आहे. ग्रामपंचायतीमार्फत पारडगाव- बेटाळा मुख्य रस्त्यापासून एक किमी अंतरावर असलेल्या पारडगाव स्मशानभूमीच्या खडीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. खडीकरणाकरिता संपूर्ण एक किमी अंतरावर मुरमाचे ढीग टाकण्यात आले आहे. मुरुम टाकून दोन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा अद्यापपर्यंत स्मशानभूमीकडे जाणार्‍या रस्त्यावरील मुरुम पसरविण्यात आला नाही. दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमीपर्यंत बैलगाडी किंवा ट्रॅक्टरद्वारे लाकडे नेता येत होते. आता मात्र या रस्त्यावर मुरुमाचे ढिगारे पडून असल्याने मृतदेह नेण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. तसेच मुरमाच्या ढिगार्‍यामुळे लाकूड भरलेली बंडी, ट्रॅक्टर स्मशानभूमीपर्यंत नेता येत नसल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनाच लाकडे खांद्यावर घेऊन जावे लागत आहे.

ग्रामपंचायतीने नागरिकांची समस्या लक्षात घेता त्वरित मुरुम पसरविण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र याकडे ग्राम पंचायत पदाधिकारी तथा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात ग्रामसेवक राऊत यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Star workout for funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.