खोटी रजिस्ट्री प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे पेशी
By Admin | Updated: August 3, 2014 23:18 IST2014-08-03T23:18:11+5:302014-08-03T23:18:11+5:30
राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९/२१ मधील ६६ आर जागेचे खोटे विक्रीपत्र तयार केल्याची तक्रार येथील शंकुतला मेश्राम आणि चंद्रप्रकाश मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती.

खोटी रजिस्ट्री प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे पेशी
राजुरा : राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९/२१ मधील ६६ आर जागेचे खोटे विक्रीपत्र तयार केल्याची तक्रार येथील शंकुतला मेश्राम आणि चंद्रप्रकाश मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. या तक्रारीमध्ये खोट्या व बनावट स्वाक्षरी मारुन खोटे साक्ष पुरावे जोडून फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार चंद्रपूरचे सह जिल्हा निबंधक वर्ग- १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी ७ आॅगस्टला सकाळी ११ वाजता शेती खरेदी करणारे संभा कोवे, विक्रीपत्र करुन देणारे माधव मेश्राम, पंचफुला मेश्राम, तक्रारकर्ते शंकुतला मेश्राम, चंद्रप्रकाश मेश्राम व साक्ष देणारे राजुराचे माजी नगरसेवक पाडुरंग चिल्लावार, दुसरे साक्षीदार शंकर मत्ते या सातही व्यक्तींना पाचारण केले आहे.
साक्ष व आपली मते पुराव्यासह यावेळी सर्वांना मांडावी लागणार आहे. जर तक्रारकर्त्याजवळ पुरावे सबळ असेल तर खोटी रजिस्ट्री केल्यामुळे अनेकांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. या प्रकरणातील तक्रारकर्ते शंकुतला मेश्राम, चंद्रप्रकाश मेश्राम यांची घरी जाऊन भेट घेतली असता त्यांनी विक्रीपत्रात आमच्या खोट्या स्वाक्षऱ्या, अंगठा मारला असल्याचे सांगितले.(शहर प्रतिनिधी)