लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्या सोडविण्याकरिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.वरोरा तालुक्यातील जामखुला ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजनेअंतर्गत मंजुरी प्रदान झाली असून सदर कामाच्या ई टेंडरिंंगची कार्यवाही पूर्ण करून काम करण्याचे आदेश मार्च २०१८ मध्ये देण्यात आले. सदर काम दुष्काळ परिस्थिती बघता जलदगतीने पूर्ण करून निधीचा पहिला हप्ता देण्यात यावा, बामर्डा येथील राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजनेअंतर्गत मंजुरी प्राप्त झाली. ई-टेंडरिंग कार्यवाही पूर्ण करून जानेवारी २०१८ मध्ये काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. सदर काम जलदगतीने सुरू करून निधीचा पहिला हप्ता देण्यात यावा, पांझुर्णी व निलसई गावामध्ये राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम योजना मंजुर असून ई टेंडरिंग करण्यात आले. सदर काम पाणी पुरवठा समितीमार्फत करून त्वरीत निधी उपलब्ध करून द्यावा, वाघनख येथील पाईपलाईनचे काम विशेष देखभाल दुरुस्तीतंर्गत मंजुर करण्यात आले. परंतु कामाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले नाही. त्यामुळे टेंडरची कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होणार- धानोरकरवरोरा तालुक्यातील जामखुला, बामर्डा या गावात राष्ट्रीय पेयजेल योजना मंजुर झाल्या. त्यात ३० टक्के निधी तातडीने देण्यात येणार आहे. तसेच शेंबळ, पांझुर्णी, मेसा, निलजी, पिंपळगाव गावातील पाणी पुरवठा योजनेचे कामाचे टेंडर काढले जाणार असून काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असुन पाणी पुरवठ्याचे प्रलंबीत कामे निकाली निघणार असल्याची माहिती आ. बाळू धानोरकर यांनी दिली.
ग्रा.पं.तील समस्यांसाठी सीईओंना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:17 IST
तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत विविध समस्या सोडविण्याकरिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आ. बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
ग्रा.पं.तील समस्यांसाठी सीईओंना साकडे
ठळक मुद्देई-टेंडरिंगची कामे पूर्ण करा : प्रलंबित कामे जलदगतीने करावी