एसटी बस पहाडावरून घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:31 IST2018-11-30T00:30:51+5:302018-11-30T00:31:33+5:30
माणिकगड पहाडावरील विष्णू मंदिराजवळ बस थांबली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती मागे घसरत येऊन छोट्या पुलाच्या बाजुला रस्त्याच्या खाली आली. बसमध्ये ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटा गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली.

एसटी बस पहाडावरून घसरली
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : माणिकगड पहाडावरील विष्णू मंदिराजवळ बस थांबली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती मागे घसरत येऊन छोट्या पुलाच्या बाजुला रस्त्याच्या खाली आली. बसमध्ये ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटा गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली.
चंद्रपूर - राजुरा - गडचांदूर - जिवती - परमडोली या मार्गाची एम.एच. ४०, ८६४४ क्रमांकाची बस गडचांदूरहून जिवतीकडे जात असताना विष्णू मंदिराजवळ बसमधील तांत्रिक बिघाडामुळे बस मागे आली. छोट्या पुलाचा भाग असल्यामुळे व काही झाडांच्या आधारामुळे बस खाली जाण्यापासून वाचली. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच गडचांदूरचे ठाणेदार सुनीलसिंग पवार, राजुराचे आगारप्रमुख आशिष मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रवाश्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवून दिले. पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार करीत आहे. या संदर्भात बसचालकाचे बयाण घेण्यात आले आहे.