एसटीत खबरदारी तर खासगी बसेस वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:57+5:30

चंद्रपूर आगारातून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दररोज २७६ बसेस सोडल्या जातात. कोरोना व्हायरसचा देशात धुमाकुळ सुरू असतानाही राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध ठिकाणी जागृती फलक लावण्यात आले. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात खबरदारी म्हणून प्रयत्न सुरू केल्याचे आज दिसून आले.

ST be careful while private buses wind | एसटीत खबरदारी तर खासगी बसेस वाऱ्यावर

एसटीत खबरदारी तर खासगी बसेस वाऱ्यावर

Next
ठळक मुद्दे‘कोरोना’ धास्तीने टाळत आहेत प्रवास : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता पानठेले बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना व्हायरसचा जिल्ह्यात आतापर्यंत एक रूग्ण आढळला नसला तरी जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळणारे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जारी केल्या. कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्यतो प्रवास टाळा असेही निर्देश देण्यात आले. त्यामुळे एसटीमध्ये कोरोनाबाबत प्रवाशांची काळजी घेतली जात आहे तर प्रवाशांना नेहमीप्रमाणे कोंबून नेण्याचे प्रकार सुरूच असल्याचे बुधवारी जिल्ह्यात सर्वत्र दिसून आले.
चंद्रपूर आगारातून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दररोज २७६ बसेस सोडल्या जातात. कोरोना व्हायरसचा देशात धुमाकुळ सुरू असतानाही राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध ठिकाणी जागृती फलक लावण्यात आले. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात खबरदारी म्हणून प्रयत्न सुरू केल्याचे आज दिसून आले. आगारातून बसेस बाहेर सोडण्यापूर्वी सॅनिटायझर मिश्रीत पाण्याने स्वच्छता केली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिक बाहेरगावी जाणेच टाळत आहेत. एसटी महामंडळाची बस दिवसापासून ४०-५० प्रवासी घेऊन येत असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे चंद्रपूर बसस्थानक परिसरातील प्रवाशांची गर्दी ओसरली आहे. बसफे ऱ्यांना मोठा प्रतिसाद नाही. सद्य:स्थितीत सर्वच बसेस सुरू असल्या तरी लांब पल्ल्याच्या बसेसचे परतीचे आरक्षण वाढल्याची माहिती वाहन चालकांनी दिली. खासगी बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. जिल्हा प्रशासनाने जीवनाश्यक वस्तुंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहरातील बहुतांश वार्डातील पानठेले व काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

२७६ बसेसमध्ये लावणार जागृती पत्रके
कोरोना आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती मिळावी, यासाठी चंद्रपूर आगारातील २७६ बसेसमध्ये मंगळवारपासून जागृती पत्रके लावण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पोस्टर्स बॅनर्स हटविले
ब्रह्मपुरी : राज्यात कोरोना जोर पकडू लागल्याने नगर परिषदेने शहरातील पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी दिवसभर शहरातील सर्व प्रभागात कोरोना विषाणूपासून काळजी घेण्याचे आवाहन ध्वनीक्षेपाद्वारे करण्यात आले.

कापूस खरेदी व नोंदणी बंद
वरोरा : मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणुचा धसका सर्वत्र पसरला आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कापूस निघत असल्याने तो विकण्याकरिता शेतकरी गर्दी करीत आहेत. मात्र, ही गर्दी टाळण्याकरिता शासकीय कापूस खरेदी व नोंदणी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

उपाययोजनेबरोबरच जनजागृती
चंद्रपूर : कोरोना (कोविड-१९) या विषाणूच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन अनेक उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षणविषयक साहित्य तयार करण्यात. हे प्रबोधनपर साहित्य नागरिकांना वितरीत केले जात आहे.

विद्यार्थी येत आहेत गावाकडे परत
सुट्टी जाहीर केल्याने मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व अन्य शहरांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या गावाकडे परत येत आहेत. त्यामुळे चंद्रपूर बसस्थानकावर मंगळवारी दुपारी बहुतांश विद्यार्थी दिसून आले. त्यांच्यासोबत पालकही होते.

आठवडी बाजार रद्द
नागभीड : कोरोणा आजाराबाबत खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषदेने १९ व २६ मार्च रोजी भरणारा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. याशिवाय ३१ मार्चपर्यंत शहरात कोणतेही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.

महानगर पालिकेतर्फे ‘कोरोना कक्ष’
चंद्रपूर : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिकेतर्फे ‘कोरोना कक्ष’ स्थापित करण्यात आला आहे. सदर कक्षाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने शासनाकडून वेळोवेळी कळविण्यात येणाºया उपाययोजना, कोरोना संसर्गाशी संबंधित दैनंदिन पत्रव्यवहार, साप्ताहिक, मासिक अहवाल, सभा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे नियोजन केले जाणार आहे. खबरदारी म्हणून शासकीय व खासगी शाळा, चित्रपटगृह, मॉल, नाट्यगृह, व्यायामशाळा, पानठेले, खर्रा विक्री केंद्र्र, तरणतलाव, अंगणवाडी केंद्रे, मोठी मंगल कार्यालये, लग्नाचे हॉल, लॉन्स, चर्चासत्र, कार्यशाळा व संमेलन, परिषद घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना व्हायरच्या प्रतिबंधासाठी आगारातील सर्व बसेसची दररोज स्वच्छता केली जात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार उपाययोजना केल्या जात आहे. प्रवासात गर्दी होतेच. त्यावरच एसटीचे उत्पन्न अवलंबून आहे. मात्र, बसस्थानकासोबतच बसमध्येही गांभीर्याने खबरदारी घेणे सुरू आहे.
- आर. एन. पाटील,
विभागीय नियंत्रक, चंद्रपूर

Web Title: ST be careful while private buses wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.