जि.प.मध्ये राजकीय हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:22+5:30

चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Speeding up political movements in ZP | जि.प.मध्ये राजकीय हालचालींना वेग

जि.प.मध्ये राजकीय हालचालींना वेग

ठळक मुद्देवातावरण तापले : ४ जानेवारीला अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी ४ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर पंचायत समिती सभापतीपदासाठी १ जानेवारी रोजी संबंधित पंचायत समितीमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शनिवारी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील ५६ सदस्यांपैकी भाजपाकडे ३६ सदस्य तर कॉंग्रेसकडे २० सदस्य आहेत. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे आगामीकाळातही भाजपाकडे सत्ता राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कॉंग्रेसही अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसाठी ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात पीठासीन अधिकारी तथा मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी १ जानेवारी रोजी संबंधित तालुक्याचे तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी यांच्या उपस्थितीत सभापतीची निवडणूक घेणार आहे. जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पंचायत समिती सभापतीपदाच्या या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

१ जानेवारीला ठरणार नवे पं.स.सभापती
मागील महिन्यात जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत निघाली. अध्यक्षपद महिला (सर्वसाधारण) साठी राखीव आहे. जिल्हा परिषदेत भाजपचे ३६, कॉंग्रेसचे २० सदस्य आहेत. भाजपमध्ये अध्यक्ष होण्यासाठी अनेक नावांची चर्चा आहे. अध्यक्षपदाच्या निवडणीबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम राहणार आहे. सध्या भाजपकडून संध्या गुरूनुले, वैष्णवी बोडलावार, अर्चना जीवतोडे, बुध्दलवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मध्यल्या काळात कॉंग्रेसने भाजपच्या असंतुष्ठ सदस्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी कॉंग्रेसच्या काही सदस्यांची गाठी-भेटी घेतल्या. त्यांना सभापतीची आॅफरही दिली होती. मात्र, त्या आमिषाला सदस्य बळी पडले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या हालचाली काही दिवसांपासून मंदावल्या होत्या. आता निवडणूक कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला. त्यामुळे आता पुन्हा कॉंग्रेस तसेच भाजपकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Web Title: Speeding up political movements in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.