धावती दुचाकी पडली, एक ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST2021-07-09T04:19:00+5:302021-07-09T04:19:00+5:30
नेरी : चिमूर-नेरी मार्गावर कळमगावजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पडली. यात एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला. ही ...

धावती दुचाकी पडली, एक ठार; एक जखमी
नेरी : चिमूर-नेरी मार्गावर कळमगावजवळ चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी पडली. यात एकाचा मृत्यू, तर एकजण जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.
अनिल पंधरे (रा. नेरी) असे मृतकाचे नाव आहे. बुधवारी चिमूर येथून अनिल पंधरे हे सरकारी भात गिरणीची सभा आटोपून आपले सहकारी मित्र व भात गिरणीचे संचालक लीलाधर पिसे यांच्यासह दुचाकीने नेरीला येत असताना हा अपघात झाला. अनिल पंधरे हे गुरुदेव ग्रामीण बिगर शेतकी पतसंस्था नेरीचे संचालक, चिमूरच्या सरकारी भात गिरणीचे संचालक, नेरी संताजी समाज मंडळाचे संस्थापक होते.
बॉक्स
गिट्टीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात
अपघात झाला त्या मार्गावर एका पुलाचे बांधकाम सुरू आहे. कळमगाव गावाच्या अगोदर रस्त्यावर काळ्या गिट्टीचे दोन ढिगारे टाकल्याने गिट्टीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी उसळल्यामुळे व चालक अनिल पंधरे यांचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे अनेकांनी सांगितले.