सिंदेवाही नगरपंचायतीच्या हालचालींना वेग
By Admin | Updated: December 18, 2015 01:25 IST2015-12-18T01:25:44+5:302015-12-18T01:25:44+5:30
सिंदेवाही ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंदेवाही नगरपंचायतीच्या हालचालींना वेग
सिंदेवाही : सिंदेवाही ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभाग सचिवाशी चर्चा केल्याची माहिती असून नगरपंचायतीची घोषणा अधिवेशनाच्या सरतेशेवटी होण्याची शक्यता आहे.
सिंदेवाही नगरपंचायतीसाठी काही त्रुट्या होत्या. त्या दूर करण्यात आल्याने व ग्रामपंचायत निवडणुकीवर नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने शासनाला नगरपंचायत घोषीत करण्यास काही हरकत नसल्याकारणाने अधिवेशनच्या सरतेशेवटी राज्यातील दहा ते बारा तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
गत एक वर्षापासून सिंदेवाही ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे. त्यामुळे शेकडो समस्या जैसे थे आहेत. पाहिजे त्याप्रमाणे विकास होत नसल्याकारणाने सिंदेवाही नगरपंचायत होणे आवश्यक आहे. सिंदेवाही तालुका संघर्ष समिती व सर्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रितपणामुळे सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे शासनाने हा नागरिकांचा संदेश असल्यामुळे कोणतेही राजकारण न करता नगरपंचायत करण्यास काही हरकत नसल्याचे सांगण्यात येते.
नुकतेच त्यांनी तहसील विभाग व जिल्हाधिकाऱ्यांशी हितगुज केल्याची माहिती असून हिवाळी अधिवेशनच्या सरते शेवटी सिंदेवाही नगरपंचायतीची घोषणा होण्याची शक्यता असून चार दिवसांतच चित्र स्पष्ठ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)