चंद्रपूरच्या एसपींचे विखे पाटलांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:36 IST2018-09-16T22:36:26+5:302018-09-16T22:36:50+5:30
चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री एका गंभीर महिलेला रात्री १२ वाजता रक्त देऊन तिचे प्राण वाचविले.

चंद्रपूरच्या एसपींचे विखे पाटलांकडून कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री एका गंभीर महिलेला रात्री १२ वाजता रक्त देऊन तिचे प्राण वाचविले. ‘लोकमत’ने याबाबत लोकमत आॅनलाईनवर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेत तत्काळ टिष्ट्वटरवरून डॉ. महेश्वर रेड्डीचे कौतुक केले व समाजातील एक जबाबदार नागरिक म्हणून उत्तम उदाहरण घालून दिल्याचे म्हटले आहे.