पेरलेले बियाणे रानडुकरांनी केले फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:01:03+5:30

चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी सोयाबीन तसेच कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांनी यावर्षी आर्थिक जुळवाजुळव करीत पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. काही तालुक्यातील पेरण्या आटोपल्या असून काही ठिकाणी सुरु आहे.

The sown seeds were sown by the cows | पेरलेले बियाणे रानडुकरांनी केले फस्त

पेरलेले बियाणे रानडुकरांनी केले फस्त

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान : वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी कामाला लागले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा केली. मात्र वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. असाच प्रकार पोंभूर्णा तालुक्यातील चेक कोसंबी-२ येथेही घडला आहे. पेरणी केलेल्या चार एकरातील सोयाबीनचे बियाणे डुकरांनी उद्ध्वस्त केले आहे. यामुळे या डुकरांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी सोयाबीन तसेच कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी आर्थिक जुळवाजुळव करीत पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. काही तालुक्यातील पेरण्या आटोपल्या असून काही ठिकाणी सुरु आहे. दरम्यान, पोंभूर्णा तालुक्यातील चक कोसंबी-२ येथील प्रगतीशील शेतकरी वसंतराव पोटे यांनी चार एकर शेतामध्ये २२ तसेच २३ जूनरोजी सोयाबीनची पेरणी केली. पेरणी झाल्यामुळे चिंतामुक्त झालेले शेतकरी पोटे यांनी दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन बघितले असता डुकरांनी शेतातील पेरलेले सोयाबीन बियाणे उद्ध्वस्त केल्याचे त्यांना दिसले. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. यासंदर्भात त्यांनी पंचायत समिती तसेच वनविभागाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र पेरणी केलेले बियाणेच उद्वस्त केल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या शेतामध्ये त्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार असून उशीर झाल्यामुळे उत्पादनावरही परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधितांनी दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी तसेच परिसरातील डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: The sown seeds were sown by the cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.