पेरणी झाली; परंतु रोवणीला विलंब
By Admin | Updated: July 30, 2014 23:57 IST2014-07-30T23:57:45+5:302014-07-30T23:57:45+5:30
धाबा व परिसरात शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात धान पेरणी केली. परंतु पाऊस अल्प प्रमाणात झाल्यामुळे रोवणीला उशीर होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

पेरणी झाली; परंतु रोवणीला विलंब
धाबा : धाबा व परिसरात शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात धान पेरणी केली. परंतु पाऊस अल्प प्रमाणात झाल्यामुळे रोवणीला उशीर होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
जून महिना कोरडा गेला व जुलै मध्येही पाऊस येईल, अशी शेतकऱ्यांंनी आशा पकडली व बँकेतून मोठ्या प्रमाणात पिकासाठी पीककर्ज घेतले व धान बिजाई, सोयाबीन बिजाई व खत खरेदी केले. आता पेरणीसुद्धा झाली. अल्प पावसामुळे बिजाई काही ठिकाणी उगवली तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली असे चित्र धाबा व परिसरात दिसून येते. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हा चिंताग्रस्त होत चालला आहे. आॅगस्ट महिना येऊन ठेपला तरी यावर्षी कोणत्याही ठिकणी तलाव, कालवे याच्यात पााणी साचून नसल्यामुळे पऱ्हे उगवले. परंतु रोवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तरी शेतकरी आशा पकडून जीवन जगत आहे. शेतामध्ये कोणत्याही ठिकाणी पाणी साचून नाही. पूर्णपणे जमिनीत ओलावा निर्माण झाला नाही. शेतकरी मोठा पाऊस झाला पाहिजे, या प्रतीक्षेत आहे. परंतु निसर्गाच्या पुढे कोणाचेही चालत नाही, हे आपल्याला दिसत आहे.
कदाचित मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर रोवणीची एकाच वेळेच धांदल उडेल व शेतमजुराच्या मजुरीचे भाव माोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीतीही शेतकऱ्यांना आहे. ते काहीही असो, शेतकरी बांधव आजही ग्रामीण भागात पावसासाठी भजनदिंडी व रात्रभर जागरण हे चित्र पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची ही प्रार्थना साध्य होऊन परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन रोवणी व्हावी, अशी इच्छा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)