शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर तालुक्यात हजारो हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी

By admin | Updated: October 21, 2014 22:49 IST

जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे.

खडसंगी : जिल्ह्यात मागील अनेक महिन्यांपासून वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने यावर्षात खरीप हंगामातील सोयाबीनचे नगदी पीक शेतकऱ्यांच्या हातातून हिरावले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय झालेली आहे. मात्र, खरीप पिकाची भरपाई रब्बी पिकातून काढण्याच्या तयारीला सद्या शेतकरी लागला असून रब्बी पिकाच्या मशागतीला सुरुवात केल्याचे चित्र चिमूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे.यावर्षी खरीप हंगामाला पावसाने सुरुवातीला चांगलाच दगा दिल्याने जुलैपर्यंत सोयाबीन व कापसाच्या अत्यल्प पेरण्या झाल्या होत्या. मात्र आॅगस्टमधील पावसामुळे खरीपातील सोयाबीन व कापूस ६५ ते ७० टक्के पेरण्या झाल्या. सद्या तालुक्यात रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरू झाली आहे. मागील महिन्यात काही गावात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना सुखावले. चिमूर तालुक्यात रब्बीची सर्वाधिक पेरणी खडसंगी, आमडी, भिसी, शंकरपूर, बोथली, महालगाव या गावात जास्त प्रमाणात करण्यात येते. कृषी विभागाने देखील खरीपातील कमी पेरण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा रब्बी पिकासाठी जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रावरील पेरणीचे नियोजन केले आहे. तालुक्यात रब्बीच्या गहू, चना, लाख पेरणीसाठी जमीन तयार झाल्या असून अल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी खरीप पिकाची काढणी उखरताच आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात पेरणीला मोठ्या प्रमाणत वेग येणार आहे.यावर्षात वरुन राजाने अवकृपा दाखविल्याने शेततळे, तलावात पाण्याचा साठा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पाण्याच्या चिंतेत आहे. तालुक्यात सिंचनाच्या कुठल्याही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागत असल्याने बळीराजा चिंतेत आहे. मात्र खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई या रब्बी हंगामात काढण्याच्या आशेवर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मशागतीचे कामे करीत आहेत. मात्र या विंवचनेतून निघण्यासाठी सद्या शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावरच अवलंबून असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. (वार्ताहर)