कंत्राटी घंटागाडी कामगारांच्या विविध समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST2021-01-08T05:33:38+5:302021-01-08T05:33:38+5:30

यंग चांदा ब्रिगेडने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाही घंटागाडी कंत्राटी कामगार ...

Solve various problems of contract bell workers | कंत्राटी घंटागाडी कामगारांच्या विविध समस्या सोडवा

कंत्राटी घंटागाडी कामगारांच्या विविध समस्या सोडवा

यंग चांदा ब्रिगेडने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असतानाही घंटागाडी कंत्राटी कामगार चंद्रपूर शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. नवीन कंत्राटदारांकडे घंटागाडी कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे, जानेवारी २०२१ पासून घंटागाडी कामगारांना किमान वेतन लागू करावे, नवीन निविदा प्रक्रियेला वेळ लागत असेल तर मनपा घंटागाडी कामगारांना जानेवारी महिन्यापासून किमान वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. येत्या आठ दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन आयुक्त मोहिते यांनी दिले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटिका वंदना हातगावकर, शहर संघटक कलाकार मल्लारप, राहुल मोहुर्ले, करणसिंह बैस, नकुल वासमवार, दुर्गा वैरागडे, डोमाजी डोंगरे, कोडबा मून, प्रकाश जुमडे, गणेश मुद्दलवार, कीर्ती सिंग, रुपेश कजरीवाले आदी उपस्थित होते.

Web Title: Solve various problems of contract bell workers