प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST2020-12-14T04:39:24+5:302020-12-14T04:39:24+5:30

चंद्रपूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री ...

Solve the problems of elementary teachers | प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवा

चंद्रपूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राचारण करुन समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.

प्रहार शिक्षक संघटनेने प्रलंबित मागण्यांचे निवेदन जि. प. शासनाला वारंवार दिले होते. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी (सामान्य) यांनी प्रहार शिक्षक संघटनेबरोबर समस्या निवारण सभा घेतली. यावेळी १५ दिवसांत समस्या निराकरण करण्याचे निर्देश दिले. परंतु कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेने आपल्या मागण्या घेवून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राचारण करुन प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन, सावली पंचायत समिती अंतर्गत ८६ शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगातील थकबाकीची रक्कम, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रहार शिक्षक संघटनेची समस्या निवारण सभा शुक्रवारी घेण्याचे मान्य केले. यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदास सांगोडे, जिल्हा संपर्क प्रमुख चानकुमार खोब्रागडे, जिल्हा प्रतिनिधी हिरालाल बन्सोड, होमेंद्र मेश्राम, नागेश सुखदेवे, दिनेश कवाडे, अमोल बदने, तालुका अध्यक्ष प्रदीप टिपले, सुभाष चांदेकर, शंकर मिरे, बबलू पुणेकर, रामेश्र्वर भोयर, सुधा सिंह, पोर्णिमा शेंडे, मंगला सोनरखन, वर्षा राऊत, आशा कारवाटकर, रमा दुपारे, रंजना कुंभारे, विशाखा झाडे, शिला धुळे, सिमा वंदिले, मुन्ना गवळी, अनिल आंबटकर, दिवाकर पेंदाम, संदीप गेडाम, विनोद लांडगे आदी उपस्थित होते.

Web Title: Solve the problems of elementary teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.