खोकरी गावातील प्रलंबित समस्यांचे निराकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:14+5:302021-07-02T04:20:14+5:30
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील गट ग्रामपंचायत खोकरी येथे अनेक प्रलंबित समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. तसेच शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित ...

खोकरी गावातील प्रलंबित समस्यांचे निराकरण करा
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील गट ग्रामपंचायत खोकरी येथे अनेक प्रलंबित समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. तसेच शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. आपल्या गावाच्या विकासासाठी गट ग्रामपंचायत खोकरी येथील गावकऱ्यांनी पंचायत समिती सभापती यांना निवेदन देऊन समस्यांची जाणीव करून दिली.
खोकरी गट ग्रामपंचायत हे १५० घरांची वस्ती असलेले गाव आहे. गेल्या चार वर्षांपासून नालेसफाई झाली नाही, त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित असल्याने इतर शासकीय कामांकरिता गावकऱ्यांना बेलगाव ग्रामपंचायतीकडे वारंवार धाव घ्यावी लागते. त्यातच पावसाळ्यात पिण्याचे पाणी गढूळ झाल्याने तेच पाणी प्यावे लागते आणि शासनाने राबविलेल्या योजनेची माहिती मिळत नसून अनेक लाभांपासून वंचित ठेवले आहे. अशा अनेक समस्यांनी गावकरी त्रस्त झाले असून, संताप व्यक्त केला जात आहे. खोकरी ग्रामपंचायत अंतर्गत निर्माण झालेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी आहे. निवेदन देताना उपसरपंच वैशाली जीवतोडे व गावकरी उपस्थित होते.
010721\1639-img-20210701-wa0069.jpg
खोकरी गावातील प्रलंबित समस्यांचे निराकरण करा