समाधान आणि नाराजीही
By Admin | Updated: July 8, 2014 23:23 IST2014-07-08T23:23:22+5:302014-07-08T23:23:22+5:30
रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली.

समाधान आणि नाराजीही
प्रतिक्रिया : काजीपेठ-मुंबई थेट रेल्वेमुळे प्रवाशांना दिलासा
चंद्रपूर : रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी रेल्वे बजट सादर केला. या बजेटमध्ये जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता काहींना समाधान तर, काहींनी या बजेटवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान मागील १५ वर्षांपासूनची मागणी असलेली काजीपेठ-मुंबई ही रेल्वे सुरु होणार असल्याने चंद्रपूर- बल्लापूर येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
अपेक्षेनुसार बजेट- सुंचूवार
मागील १५ वर्षांपासून मुंबईसाठी रेल्वेची मागणी करण्यात येत होती. ही मागणी पूर्ण झाली आहे. या बजेटमध्ये सर्व राज्यांना सामावून घेतले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कर्मचारी भरती करण्यात येणार असल्याचे मत जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशनचे अध्यक्ष तसेच रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी व्यक्त केले.
विकासाला गती मिळेल
सादर झालेला रेल्वे बजेट विकासाला गती देणारा आहे. हायस्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आल्याने भविष्यात प्रवाशांना सोयीचे होणार आहे. रेल्वे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचतिल अशी अपेक्षा आहे. प्लॅटफाम व अनारक्षित टिकीट आता इंटरनेटरवर उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच रेल्वेला होत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी एफडीआयचा प्रस्ताव आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी योग्य असल्याचे मत सतीश चहारे यांनी व्यक्त केले.
अनेक आश्वासने
रेल्वेमंत्र्यांनी बजेटमध्ये रेल्वेच्या सुविधेसाठी पैसा कुठून येणार याबद्दल आपल्या सांगितले नाही. बजेटमध्ये खासगीकरण तसेच कॉर्पोरेटवर जास्त भर देण्यात आला. यामुळे खासगीकरण झाल्यास रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य काय, काय, असा प्रश्न उपस्थित करून बजेटमधील काही घोषणा स्वागतार्य आहे. एफडीआय व कॉर्पोरेटमुळे चिंता वाढविणारा आहे. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात अन्य गोष्टींवरही भर देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याचे मत सुरेश मडावी यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर-गडचिरोलीकडे दुर्लक्ष
रेल्वे विभागाने सादर केलेल्या बजेटमध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला स्थान दिले नाही. नागभीड-नागपूरला रेल्वे मार्गाला ब्राडगेजमध्ये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विदर्भाला पाहिजे तसे झुकते माप देण्यात आले नाही. विदर्भात अनेक शहरात अद्यापही रेल्वे पोहचली नाही. त्यामुळे विदर्भाकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे होते. बजेट विदर्भावर अन्याय करणारा असल्याचे मत राकेश पोतराजे यांनी व्यक्त केले.
दिलासा देणारा रेल्वे अर्थसंकल्प
स्वच्छता ते आधुनुकीकरण असा रेल्वे अर्थसंकल्प आहे.बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रवाश्यांसाठी अच्छे दिन आले आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे बेरोजगारीवर काही प्रमाणात मात करण्यात येणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प सर्वसमावेश असून सर्व राज्यांना समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे. काही नव्या गाड्याही सुरु करण्यात आल्याचे मत राजू शामडुले यांनी व्यक्त केले.