जामीनदाराचा हृदयविकाराने मृत्यू
By Admin | Updated: September 7, 2015 01:20 IST2015-09-07T01:20:24+5:302015-09-07T01:20:24+5:30
अवैध दारू विक्रीच्या प्रकरणातील आरोपींचा जामीन घेण्यासाठी आलेल्या जमानतदाराचा येथील न्यायालय परिसरात हृदयविकाराने मृत्यू झाला.

जामीनदाराचा हृदयविकाराने मृत्यू
ब्रह्मपुरीतील घटना : उपचारापूर्वीच झाले निधन
ब्रह्मपुरी : अवैध दारू विक्रीच्या प्रकरणातील आरोपींचा जामीन घेण्यासाठी आलेल्या जमानतदाराचा येथील न्यायालय परिसरात हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना ५ सप्टेंबरला दुपारी घडली.
३० आॅगस्टला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केलेल्या अवैध दारू विक्री प्रकरणातील आरोपी व २ सप्टेंबरला अटक करण्यात आलेले अवैध दारू विक्री प्रकरणातील आरोपींनी पवनी (जि. भंडारा) येथून दारू आणली होती, हे चौकशीत स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पवनी तालुक्यातील गावड येथील देशी दारू दुकानदार अरविंद आसाराम शेंडे याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या जमानतीसाठी आलेले चिचाळा येथील पुरुषोत्तम नंदेश्वरा (४०) यांचा न्यायालय परिसरातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी त्यांना उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास बी.टी. श्रीवास्तव यांच्यासह काही जागृक नागरिकांनी जिवाची पर्वा न करता ३० पेट्या दारूसह आरोपी स्वप्नील महादेव पाळ व नफूळ ज्ञानेश्वर जवादे यांना पोलिसाच्या स्वाधीन केले. दुसरी घटनेत रमाबाई चौकात १० पेटी देशी दारूसह राहूल प्रकाश मैद याला ब्रह्मपुरी पोलिसांनी अटक केली. दोन्ही अवैध दारूविक्रेत्यांनी पवनी तालुक्यातील गावड येथील देशी दारू दुकानदार अरविंद आसाराम शेंडे यांच्या दुकानातून दारू घेतल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शेंडे याला अटक केली. जामिनासाठी शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. जामिनदार म्हणून पुरुषोत्तम नंदेश्वर यांना बोलविले होते. पुरूषोत्तम नंदेश्वर न्यायालय परिसरातील झाडाखाली बसून असता त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. लगेच त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)