सामजिक बांधिलकी; कोरोना संकटात व्हॉट्सअप समुहाने पुरविले ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 01:27 PM2020-10-03T13:27:46+5:302020-10-03T13:28:09+5:30

corona, Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील श्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते.

Social commitment; Oxygen supplied by WhatsApp group in Corona crisis | सामजिक बांधिलकी; कोरोना संकटात व्हॉट्सअप समुहाने पुरविले ऑक्सिजन

सामजिक बांधिलकी; कोरोना संकटात व्हॉट्सअप समुहाने पुरविले ऑक्सिजन

Next
ठळक मुद्दे कोणत्याही कारमध्ये ठेवतो सिलिंडर


राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मोबाईल व्हॉटसअ‍ॅपमुळे जग जवळ आले. काही व्यक्ती याचा वापर चांगल्याच कामासाठी करतात असे ठामपणे म्हणता येत नाही. चॅटींग, चिटिंग करण्यात वेळ घालण्याची शक्यताही असते. मात्र, सामाजिक बांधिलकी जोपासून कोरोना महामारीच्या काळात मदत करणारे विरळेच असतात. कोरोनामुळे ऑक्सिजन पातळी कमी होते, हे डॉक्टरांकडून कळताच शहरातील श्रीकृष्ण व्हॉटसअ‍ॅप समुहाच्या सदस्यांनी अवघ्या तासातच ७५ हजार रूपयांचा निधी गोळा केला. त्यातून ऑक्सिजन सिलिंडर व साहित्य विकत घेवून गुरूवारी स्थानिक गांधी चौकात नागरिकांना समर्पित केले.
कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला. गंभीर रूग्णाला ऑक्सिजन मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे श्रीकृष्ण व्हॉट्सअप ग्रुपचे अभियंता किशोर कापगते व सहकाऱ्यांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑक्सिजन मशीन घेण्याची कल्पना मांडली. सर्वांनी हा उपक्रम उचलून धरला. सदस्यांनी श्रीकृष्ण समुहावर मदत करण्याचे संदेश व्हायरल केले. अवघ्या काही तासातच कुणी रोख तर कुणी गुगल पे वरून मदत केल्याने ७५ हजारांचा निधी जमा झाला. या रकमेतून ऑक्सिजन सिलिंडर घेण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही कारमध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी लावता येईल, अशा प्रकारचे ऑक्सिजन सिलिंडर विकत घेण्यात आले. श्रीकृष्ण समूहाच्या वर्धापन दिनी गुरूवारी ग्रुप सदस्य व सेवाभावी व्यावसायिक जीवन कोंतमवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या हस्ते महात्मा गांधी चौकात नागरिकांना समर्पित करण्यात आले.

रूग्णांना मिळणार जीवदान
श्रीकृष्ण व्हॉट्सअप समुहाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे गंभीर व गरजु रूग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येणार आहे. समाज माध्यमांच्या योग्य वापर करणारे नागरिक पुढे आले तर यातून लोकोपयोगी चळवळ उभी राहू शकते. कोरोनामुळे माणसे एकमेकांपासून दूर जावे नये, यासाठी अशा सेवाभावी व्यक्तींची गरज आहे. विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा जनकल्याण्याचे उपक्रम राबविले तर अनेकांचे जीव वाचवा येवू शकते, हे या ग्रुपने सिद्ध करून दाखवले आहे.

Web Title: Social commitment; Oxygen supplied by WhatsApp group in Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app