स्माईल प्लीज म्हणणाऱ्याचेच हरविले हसू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:51+5:30

मोबाईल क्रांतीमुळे फोटोग्राफी व्यवसाय असाही अडचणीत आला आहे. घरगुती कार्यक्रमापासून तर विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आता मोबाईलमध्ये काढले जात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांची मदार लग्नसराईवरच अवलंबून आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे हा व्यवसाय संपुष्टात आला आहे. अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही परत करावी लागली आहे. मुंज, वाढदिवसाच्या लहान-मोठे ऑर्डर मिळणे बंद झाले.

The smile of the one who says smile please | स्माईल प्लीज म्हणणाऱ्याचेच हरविले हसू

स्माईल प्लीज म्हणणाऱ्याचेच हरविले हसू

ठळक मुद्देफोटोग्राफी व्यवसायावर संकट, लग्नसराई बुडाल्याने उदर निर्वाहाचा प्रश्न

राजकुमार चुनारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ऐन लग्नसराईत कोरोनाचे संकट उद्भवल्याने फोटोग्राफीचा व्यवसाय करताना इतरांना स्माईल ‘स्माईल प्लीज’ म्हणणाऱ्यांचेच कारोनाने हसू हरविले आहे. लॉकडाऊनमुळे यंदाचा व्यवसाय बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅमेºयासाठी घेतलेले कर्ज, दुकान भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन या चिंतेने फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे हैराण झाले आहेत.
मोबाईल क्रांतीमुळे फोटोग्राफी व्यवसाय असाही अडचणीत आला आहे. घरगुती कार्यक्रमापासून तर विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आता मोबाईलमध्ये काढले जात आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांची मदार लग्नसराईवरच अवलंबून आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे हा व्यवसाय संपुष्टात आला आहे. अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही परत करावी लागली आहे. मुंज, वाढदिवसाच्या लहान-मोठे ऑर्डर मिळणे बंद झाले. त्यात फोटोग्राफी व्यवसाय आता दिवाळीपर्यंत पुन्हा उभारी घेण्याची शक्यता नाही. ग्राहकांकडून येणारी उधारी मिळत नाही. दुसरीकडे बँकेचे हप्ते, दुकान भाडे यासह दैनंदिन खर्च सुरूच असल्याने जिल्ह्यातील व्यावसायिक छायाचित्रकार हवालदिल झाले आहेत.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प
एका लग्नाच्या फोटो व व्हिडिओसाठी सरासरी २० हजार ते ५० हजारांपर्यंत दर आकारला जातो. एप्रिल ते जुलै दरम्यान लग्नाच्या सर्वाधिक तिथी असतात. यावेळी सर्वाधिक लग्न लागतात. त्यातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. ऐन लग्नसराईत लॉकडाऊन लागल्याने व्यवसाय बुडाला आहे. त्यामुळे शेकडो फोटोग्राफर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री स्वत: उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांनी फोटोग्राफर्सना मदतीचा हात देण्याची मागणी केली जात आहे.

फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी व एलईडी, लाईव्ह सेटअप असणारे, लॅबचालक व अल्बम विक्रेतेही, अडचणीत आले आहे. अनेकांनी या व्यवसायात गुंतवणूक केली. मात्र, संपूर्ण लग्न सराई वाया गेल्याने स्थिती बिकट झाली आहे.
- रविंद्र वाळके, फोटोग्राफी व्यावसायिक, खडसंगी

Web Title: The smile of the one who says smile please

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न