मदनापूर ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:34 IST2021-02-17T04:34:43+5:302021-02-17T04:34:43+5:30
पळसगाव (पि) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची ...

मदनापूर ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार
पळसगाव (पि) : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊन निकष पूर्ण करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्याची योजना आहे. या योजनेत चिमूर तालुक्यातील मदनापूर गावाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यामध्ये मदनापूर ग्रामपंचायतला पुरस्कार निधी मिळणार आहे. मदनापूर हे गाव नेहमी चर्चेत असणारे गाव आहे. अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन निर्मल ग्राम पुरस्कार, जिल्हा पुरस्कार, स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होणाऱ्या गावांना स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर हे निकष आहेत. या निकषात जास्तीत जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना तालुक्यात प्रथम येणाऱ्या पुरस्काराची योजना आहे.आज मा. सा. कनमवार सभागृहात हा पुरस्कार चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालान अधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते ग्रामसचिव केशव गजभे व प्रशासक टाकरस यांना देण्यात आला.