शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हाटी वाढली, बोंड नाममात्रच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चंद्रपूर आदी परिसरातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरित्या झाली. मात्र पाता आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती.

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : कृषी विभागाने जनजागृती करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हंगामाच्या सुरुवातील पडलेल्या सततधार पावसामुळे चंद्रपूर भागातील शेतकरी चांगलाच मेटाकुटास आला. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने व पिकाची योग्य निगा राखल्याने कपाशीच्या पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली. परंतु सध्या वाढलेल्या पºहाटीला पाहिजे त्या प्रमाणात पाती अन् घड लागली नसल्याने या भागातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी या परिसरातील शेतपिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चंद्रपूर आदी परिसरातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरित्या झाली. मात्र पाता आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसाने या भागातील शेतकऱ्यांना सळो की पळो करूनच सोडले. सतत पाऊ स कायम राहिल्याने शेतीची अनेक कामे खोळंबली होती. अशातच अनेक शेतशिवारांना पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचे स्वरूप आले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.शिवाय पिकाची वाढ बऱ्यापैकी झाली असे असले तरी सध्या एका कपाशीच्या झाडाला १० ते १५ इतकीच बोंड असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.यंदाच्या वर्षी सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात बऱ्यापैकी घट येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. पूर्वीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यातच उत्पादनात घट येत असल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच बाजारपेठ भावही कमी आहे. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेती