निंदा किंवा वंदा, उत्साहात

By Admin | Updated: August 18, 2015 01:14 IST2015-08-18T01:14:56+5:302015-08-18T01:14:56+5:30

एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत सृजनचा सलग ७५ वा रसिकांना समर्पित असलेला कार्यक्रम ‘निंदा किंवा

Slander | निंदा किंवा वंदा, उत्साहात

निंदा किंवा वंदा, उत्साहात

चंद्रपूर : एक महिना एक कार्यक्रम या व्रताच्या अंतर्गत सृजनचा सलग ७५ वा रसिकांना समर्पित असलेला कार्यक्रम ‘निंदा किंवा वंदा’ शहरातील चोखंदळ, दर्दी, संवेदनशिल आणि सामाजिक व सांस्कृतिक भान जोपासणाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थितीत व संध्या विरमलवार यांच्या संचालनाखाली उत्साहाच्या वातावरणात झाला.
दीपक शिव, रंगनाथ रायपुरे, रश्मी वैरागडे, मोहन बा. देशपांडे, मंदाकिनी धोटेकर, शोभा अशोक पवार, डॉ. रत्नाकर करकाडे, डॉ.अनघा वाडेकर, श्रीपाद जोशी, प्रा.डॉ.श्याम मोहरकर, सुरेश गारघाटे, स्वाती सातपुते, चंदू पाठक, प्रा.श्याम गुंडावार, सुदर्शन बारापात्रे, प्रा.धनश्री चिताडे, सुनील देशपांडे, पौर्णिमा बावने, अशोक पवार, सुषमा नगराळे, संजय झाडे आदींनी यावेळी आपले मनोगत प्रकट केले. सृजनच्या उपक्रमाचे कौतुक करीत असतानाच यावेळी रसिकांनी काही सूचनाही केल्या. जेष्ठ विचारवंत मनोहर सप्रे यांनी लिखित प्रतिक्रिया पाठविली होती. त्याचे उपस्थितांना वितरण करण्यात आले. डॉ.अनिल काटकर यांनी सृजनवर लिहिलेला लेखही यावेळी उपस्थितांना वितरित करण्यात आला. मदन पुराणिक यांनी पाठविलेल्या प्रतिक्रियाचेही यावेळी वाचन करण्यात आले. ७५ व्या कार्यक्रमाचे औचित्य साधत यावेळी उपस्थितांचे तोंडही गोड करण्यात आले. छोट्या मुलांसाठी कार्यक्रम घ्यावेत, कार्यकारिणी करावी, साहित्यिक कार्यक्रम घ्यावेत, व्हॉटसपवर ग्रुप निर्माण करावेत, देणगी स्वीकारावी, डोनेशन बॉक्स ठेवावा अशा प्रकारच्या विविध सूचना यावेळी करण्यात आल्यात. मंदाकिनी घोटेकर आणि प्रा. धनश्री चिताडे यांनी कवितेच्या रूपात आपल्या सृजनविषयीच्या भावना व्यक्त केल्यात. डॉ.अनघा वाडेकर यांनी सृजनच्या वक्तशीरपणाचे कौतुक केले तर प्रा.धनश्री चिताडे यांनी अनेक व्यक्ती आल्यात की कार्याची हानी होते, असे सांगत कार्यकारिणी नसणेच योग्य असल्याचे मत प्रकट केले. सृजन समन्वयक यांना बोलते करण्याची काहींनी अपेक्षा व्यक्त केली तर सृजनची लोकचळवळ शहरात रूजली असून सृजनने काही नवीन पायंडे निर्माण केले असल्याचे मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले. सृजन चांगले कार्यक्रम देत असते पण रसिकांचीही जबाबदारी कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची आहे असे मत प्रा.डॉ.श्याम मोहरकर यांनी व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Slander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.