देशाच्या विकासासाठी कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांची गरज

By Admin | Updated: June 26, 2016 00:40 IST2016-06-26T00:40:27+5:302016-06-26T00:40:27+5:30

देशाच्या विकासासाठी कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांची गरज असून विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून गुणवत्ता प्राप्त करून आपल्या शाळेचे नाव,

Skill needed for the development of the country | देशाच्या विकासासाठी कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांची गरज

देशाच्या विकासासाठी कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांची गरज

हंसराज अहीर : गुणवंतांचा सत्कार
राजुरा : देशाच्या विकासासाठी कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांची गरज असून विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून गुणवत्ता प्राप्त करून आपल्या शाळेचे नाव, आपल्या गावाचे नाव सोबतच आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर यांनी केले.
दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा शुक्रवारी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, बापू गेडाम, प्रशांत गुंडावार उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Skill needed for the development of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.