सहा कोरोनामुक्त, १४ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:44 IST2021-02-23T04:44:36+5:302021-02-23T04:44:36+5:30

चंद्रपूर, : जिल्ह्यात मागील २४ तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ...

Six coronal free, 14 new positive | सहा कोरोनामुक्त, १४ नवे पॉझिटिव्ह

सहा कोरोनामुक्त, १४ नवे पॉझिटिव्ह

चंद्रपूर, : जिल्ह्यात मागील २४ तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ३८२ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८४९ झाली आहे. सध्या १३६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख नऊ हजार ६३७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ८४ हजार ६४४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या घुटकाला वाॅर्डमधील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९७ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

सोमवारी बाधित आलेल्या १४ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर एक, भद्रावती एक, ब्रह्मपुरी एक व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Six coronal free, 14 new positive