खिळ्यांपासून साकारले शिवराय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:17 IST2018-11-03T22:17:07+5:302018-11-03T22:17:24+5:30
कलाकार वेडा असतो. कोणत्या वस्तुपासून कोणती कलाकृती बनविणार, घडविणार हे सांगता येत नाही. कल्पनेच्या पलिकडे त्याची भरारी असते. शहरातील बालाजी वॉर्डातील अंकिता हरिदास नवघरे हिनेही अशीच एक वेगळी किमया साधून कल्पनेची भरारी घेतली आहे.

खिळ्यांपासून साकारले शिवराय
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : कलाकार वेडा असतो. कोणत्या वस्तुपासून कोणती कलाकृती बनविणार, घडविणार हे सांगता येत नाही. कल्पनेच्या पलिकडे त्याची भरारी असते. शहरातील बालाजी वॉर्डातील अंकिता हरिदास नवघरे हिनेही अशीच एक वेगळी किमया साधून कल्पनेची भरारी घेतली आहे. लोखंडी खिळ्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची देखणी प्रतिमा तयार केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजाची प्रचलित एक मुद्रा आहे. ही मुद्रा तिने प्लॉस्टिकच्या तीनबाय तीन फुट आकाराच्या १६ हजार ९५० खिळ्यांनी अंकित केली. एकूण वजन ४० किलो भरते. प्रतिमेला तयार करण्याकरिता २९ दिवस लागले. या कलेला इज्युजन पोट्रेट म्हणतात, अशी माहिती अंकिताने दिली. अंकिता चित्रकार आहे. तिने काढलेली चित्र आंतरराष्टÑीय प्रदर्शनात पुरस्काराला पात्र ठरली सतत नव्याच्या शोधात असलेल्या अंकिताला इंटरनेटवर जर्मनच्या एन्ड्रयू मायर्स या कलावंताने खिळ्यापासून तयार केलेली प्रतिमा दिसली. त्याच प्रकारची प्रतिमा तयार करण्याचा ध्यास तिने घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे तिचे आदर्श. यामुळे खिळ्यांपासून शिवरायांची प्रतिमा तिने तयार केली. विशिष्ठ प्रकारच्या लांबीचे स्कू्र व खिळे तिने नागपुरातून आले होते.