परिस्थिती चिंताजनक ! केवळ ५३० खाटा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:21+5:302021-04-11T04:27:21+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या ४ हजार २२७ पर्यंत पोहोचली आहे. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा शहरांची हाॅटस्पॉटच्या दिशेने वाटचाल ...

The situation is worrisome! Only 530 beds left | परिस्थिती चिंताजनक ! केवळ ५३० खाटा शिल्लक

परिस्थिती चिंताजनक ! केवळ ५३० खाटा शिल्लक

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या ४ हजार २२७ पर्यंत पोहोचली आहे. चंद्रपूर, भद्रावती व वरोरा शहरांची हाॅटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेटही बरा असला तरी बाधितांच्या मृत्यूची संख्या वाढू लागली. पॉझिटिव्हिटी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रुग्णांचा ग्राफ वाढत असल्याने स्थिती नियंत्राबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. एप्रिल महिन्यापासून आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे दरदिवशी जिल्ह्यात सुमारे सहाशे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत.

वनअकादमीत ३०० पैकी उरल्या २४ खाटा

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ८, हेल्थ केअर सेंटर ३ व कोविड केअर सेंटर ८, अशी एकूण १९ केंद्रे आहेत. यामध्ये १ हजार ६४१ खाटा उपलब्ध आहेत. १ एप्रिलपासून रुग्णवाढीने वेग धरला आहे. वन अकादमी कोविड केअर सेंटरमध्ये ३०० पैकी केवळ २४ खाटा शिल्लक राहिल्या आहेत.

कुटुंबियांची धावाधाव

चंद्रपुरात पाच खासगी हॉस्पिटलमध्ये हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) सुरू आहे. या सेंटर्समध्ये ३५० खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत, यातील १५५ खाटा शिल्लक आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २४० पैकी १०० खाटा शिल्लक राहिल्या. ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमधील राखीव ७५ पैकी ४२, तर चंद्रपूर येथील पंत हॉस्पिटलमधील सर्वच २० खाटा फुल्ल झाल्या. मानवटकर हॉस्पिटलमध्ये ३० पैकी ३ शिल्लक आहेत.

२३१ रुग्ण ऑक्सिजनवर

जिल्ह्यातील २३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गंभीर लक्षणे असणारे ५५ व्हेंटिलेटर २८ व २८ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. संसर्गाचा वेग वाढत असल्याने शिल्लक असलेल्या ५३० खाटा लवकरच पुल्ल होणार आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना भरती करण्यासाठी कुटुंबीयांना धावाधाव करावी लागणार आहे.

सीसीसी व रुग्णालयनिहाय शिल्लक खाटा

वन अकादमी २४

वरोरा २३

ब्रह्मपुरी ४०

भद्रावती १०

चिमूर २२

मूल २१

राजुरा २१

बल्लारपूर ५

सावली १९

सिंदेवाही ४५

नागभीड ३७

क्राइस्ट हॉस्टिपल ७

गुलवाडे हॉस्पिटल ३८

पोटदुखे हॉस्पिटल १०

नगराळे हॉस्पिटल ५

कोतपल्लीवार ०१

झाडे हॉस्पिटल ०५

दीक्षित हॉस्पिटल १०

Web Title: The situation is worrisome! Only 530 beds left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.