पाटबंधारे विभागाचे पाप गावकऱ्यांच्या माथी

By Admin | Updated: July 24, 2014 23:46 IST2014-07-24T23:46:58+5:302014-07-24T23:46:58+5:30

विदर्भ पाटबंधारे विकास महामंंडळाच्या गलथान कारभाराचा फटका यावर्षीही नवेगाव पांडव आणि परिसरातील नागरिकांना बसत आहे. या विभागाने पुलाची योग्य उभारणी न केल्यामुळे नवेगाव

The sinister villagers of the irrigation department | पाटबंधारे विभागाचे पाप गावकऱ्यांच्या माथी

पाटबंधारे विभागाचे पाप गावकऱ्यांच्या माथी

नागभीड : विदर्भ पाटबंधारे विकास महामंंडळाच्या गलथान कारभाराचा फटका यावर्षीही नवेगाव पांडव आणि परिसरातील नागरिकांना बसत आहे. या विभागाने पुलाची योग्य उभारणी न केल्यामुळे नवेगाव पांडव- मिंंडाळा या रस्त्यावरील चार चाकी आणि दुचाकी वाहनांची वहतूक बंद झाली आहे.
नवेगाव पांडव या गावाजवळून गोसीखुर्द प्रकल्पाच्या शाखा कालव्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. हा कालवा नवेगाव पांडव- मिंंडाळा बाळापूर हा वर्दळीचा रस्ता ‘क्रास’ करून जात आहे. उल्लेखनीय बााब अशी की या रोडच्या दोन्ही बाजूने कालवा खोदण्यात आला आहे. मात्र पुलाची निर्मिती करण्यात न आल्याने कालव्याच्या एका बाजूने येणारे पाणी रोड क्रास करत वाहत जाते. यामुळे या ठिकाणचा रस्ताच वाहून जाते.
दरवर्षीचा अनुभव लक्षात यावर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी लोकांनी ओरड केली असता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच भेट दिली म्हटल्यावर या रस्त्याचा प्रश्च मार्गी लागेल, अशी लोकांची अपेक्षा होती. पण या अधिकाऱ्यांनी थातूरमातूर पद्धतीने रस्त्याची डागडूजी करून लोकांच्या अपेक्षवर पाणी फेरले.
चार- पाच दिवसाअगोदर नागभीड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने थातूरमातूर पद्धतीने तयार करण्यात आलेल्या कच्च्या पुलावर खड्डे पडून चिखल तयार झााला आहे. परिणामी जड वाहने, चारचाकी वाहने आणि दुचाकी या चिखलात फसत आहेत. यामुळे येथून या वाहनांची वाहतुकच बंद करण्यात आली आहे.
या रस्त्यावरुन नवेगाव पांडव, मिंथूर, मिंडाळा, बोंड, राजोली, देवपायली, बाळापूर, गायमुख पारडी, कोसंबी, रावळी, नवेगाव हुंडेश्वरी, वासाळा मेंढा, किटाळी मेंढा, गोवारपेठ, वासाळा मक्ता आदी गावातील नागरिकांची रोजच ये- जा असते. आता या ठिकाणाहून वाहतुकच बंद झाल्याने या गावातील नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. लोकांना इतर मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The sinister villagers of the irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.