सिंदेवाहीतील सरपंच, उपसरपंचासह ९ सदस्य अपात्र

By Admin | Updated: August 30, 2014 23:34 IST2014-08-30T23:34:39+5:302014-08-30T23:34:39+5:30

येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ९ सदस्यांवर पदाचा दुरुपयोग केल्याच ठपका ठेवत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली.

Sindhavahi Sarpanch, 9 members ineligible with sub-panchayat | सिंदेवाहीतील सरपंच, उपसरपंचासह ९ सदस्य अपात्र

सिंदेवाहीतील सरपंच, उपसरपंचासह ९ सदस्य अपात्र

सिंदेवाही : येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह ९ सदस्यांवर पदाचा दुरुपयोग केल्याच ठपका ठेवत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली. याबाबतचे आदेश विभागीय अप्पर आयुक्तांनी दिले असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सिंदेवाही ग्रामपंचायतीचे सदस्य राजु करकाडे यांनी अप्पर आयुक्त नागपूर विभागाकडे सरपंच रवींद्र नैताम, उपसरपंच योगेश बोरकुंडवार, सदस्य गंगाधर भैसारे, ज्योती सोनुले, कुंदा आदे, रवींद्र कुचनवार, रजनी भरडकर, अर्चना खोबरागडे यांच्याविरूद्ध पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीचे नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दाखल केली होती.
नियमबाह्य खर्च करणे, ठरावाविरूद्ध इतर ठिकाणी कामे करून ग्रामपंचायतीच्या फंडाचा दुरुपयोग करणे, व्यावसायिक संकुलामधील खोल्याचे अनाधिकृतरित्या वाटप करणे, बीआरजीएफ योजनेअंतर्गत रस्ते बांधकाम करताना अनियमीतता असणे, ३४० प्रकरणात अधिकार नसताना स्थावर मालमत्ता फेरफार करणे, आंगणवाडी इमारत बांधकाम करताना अनियमितता असणे, ग्रामपंचायतीची खोटी जाहिरात असलेले बील मंजूर करणे, सरकारी जागेवर अधिकार नसताना पक्के बांधकाम करण्यास परवानगी देणे. अशा स्वरुपाचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहे.
सदर आरोप चुकीचा असल्याबाबत ठोस पुरावा देण्यात सरपंच, उपसरपंच आाणि सदस्य अपयशी ठरले. अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तीवाद आणि मख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता सरपंच, उपसरपंचासह इतर ९ सदस्य हे अनियमिततेस जबाबदार असल्याचे सिध्द होते असे आदेशात नमुद असून त्यांना आपल्या पदावर राहण्यास अपात्र घोषित केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sindhavahi Sarpanch, 9 members ineligible with sub-panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.