शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

चंद्रपुरात तापमान ४८चा आकडाही पार करणार! शनिवारी होते जगात सर्वाधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 3:11 PM

फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्र दृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे.

ठळक मुद्देपशू-पक्षी बाहेर पडेनासे झालेरात्री ११-१२ पर्यंत जाणवतात उष्णतेच्या झळानवतपाची नागरिकांमध्ये धास्ती

चंद्रपूर: फक्त नावातच चंद्राची शीतलता असलेल्या आणि राज्यातली हॉट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरावर सूर्य महाराजांची वक्रदृष्टी वळली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे तापमान ४७ अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडून पुढे जाताना दिसते आहे. शनिवारी ४७.८ वर तापमान पोहचले तेव्हा ते जगातील सर्वाधिक होते अशी माहिती अल डोरॅडो या जगभरातील तापमानाची नोंद ठेवणाऱ्या संस्थेने दिली आहे. आज चंद्रपूरचे तापमान ४४, ब्रह्मपुरीचे ४४.६ वर घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला.  मात्र, २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या नवतपा या नऊ दिवसांच्या कालावधीत हा आकडा ४८ अंश सेल्सिअसची पातळी गाठेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातो आहे.

या पट्ट्यातील तापमान उन्हाळ्यात तसे नेहमी जास्तच असते.  मे महिन्याच्या प्रारंभी वादळी पावसाने हजेरी लावल्यानंतर थोडा गारवा निर्माण झाला. मात्र तो एक प्रकारचा चकवाच ठरला.

शनिवारचे तापमान जगात सर्वाधिक

त्यानंतर तापमानाने अशी उसळी घेतली की १७ मे रोजी आजवरचे सर्व आकडे मोडीत काढत ४७. ६ चा आकडा पार केला होता. त्यानंतर अल डोरॅडोच्या माहितीनुसार १९मे रोजी चंद्रपुरातील तापमान जगभरात सर्वात जास्त ४७.८ होते. तर ब्रह्मपुरीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे ४७.१,  नागपूर ४६.२ तापमानासह जगात तिसऱ्या क्रमांकाचे तापमान असलेले शहर ठरले होते. वर्ध्याचे ४५.६ तापमान जगातील सहाव्या क्रमांकाचे होते. 

२००७मध्ये होते ४९

अर्थात तापमानाचे हे आकडे भलतेच तापवणारे वाटत असले तरी याधीही चंद्रपुरात २ जून २००७ रोजी ४९ अंश सेल्सिअस हा तापमानाचा उच्चांक नोंदविला गेला आहे. त्याआधी २ मे २००४ रोजी ४७.३ तर ३१ मे २०१३ रोजी ४८.२ अंश सेल्सिअस असे तापमान नोंदविले गेले आहे.

तप्त उन्हामुळे जलस्रोत आटलेजसजशे उन्ह तापू लागले आहे, तसे जलाशय, नदी, तलाव-बोड्यातील पाणी आटू लागले आहे. आता तर तप्त उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटत चालले आहे. ग्रामीण भागातील अनेक बोअरवेल्स बंद आहेत. विहिरी आटत चालल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोरपना, जिवती तालुक्यात तर पाण्याची भिषण टंचाई जाणवत आहे. चंद्रपुरातील घरगुती विहिरींनीही तळ गाठला आहे.

सरपटणारे प्राणी, पक्षी दिसेना !मागील तीन दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. पारा सातत्याने वाढत आहे. येणाºया काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. या वाढत्या तापमानामुळे सरपटणारे प्राणी, पक्ष्यांनाही धोका निर्माण झाला आहे. एरवी शहरात ठिकठिकाणी दिसणारे पक्षी आता फार कमी दिसत आहे. सरपटणाºया प्राणी थोडाफार गारवा असेल त्या ठिकाणी दडी मारली आहे. त्यामुळे तेदेखील दिसून येत नाही.

काळजी घेणे गरजेचेसध्या चंद्रपुरात उष्णतेची लाट सुरू आहे. या वाढत्या तापमानात नागरिकांनी विशेषत: वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल कपडे घालावे, थंड वातावरणात रहावे, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करणे टाळावे, अस्वस्थपणा, थकवा, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे उष्माघाताची असून असे आढळल्यास थंडगार पाण्याने आंघोळ करावी, थंड जागेत आराम करावा, भरपूर थंड पाणी प्यावे किंवा लिंबू पाणी, आंब्याचे पन्हे प्यावे, परिश्रमाचे काम करू नये, रुग्णालयात उपचार करून घ्यावा.

टॅग्स :Temperatureतापमानnagpurनागपूर