खंडणी वसुली प्रकरणात श्रीराम सेनेच्या अध्यक्षास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:38 IST2021-02-27T04:38:30+5:302021-02-27T04:38:30+5:30

अजय यादव रा. शक्तिनगर दुर्गापूर असे अटक झालेल्या श्रीराम सेनेच्या अध्यक्षाचे नाव आहे. गत अनेक दिवसांपासून ट्रॅक्टरमालकांकडून हा सतत ...

Shriram Sena president arrested in ransom case | खंडणी वसुली प्रकरणात श्रीराम सेनेच्या अध्यक्षास अटक

खंडणी वसुली प्रकरणात श्रीराम सेनेच्या अध्यक्षास अटक

अजय यादव रा. शक्तिनगर दुर्गापूर असे अटक झालेल्या श्रीराम सेनेच्या अध्यक्षाचे नाव आहे. गत अनेक दिवसांपासून ट्रॅक्टरमालकांकडून हा सतत खंडणी वसुली करीत होता. दरम्यान वसंता तोडासे हा ट्रॅक्टर चालक भरण भरून येत होता. मध्येच आपली गाडी आडवी करून ट्रॅक्टर अडवले. त्याला अश्लील शिवीगाळ करीत पैशाची मागणी केली; मात्र ट्रॅक्टरचालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने आपल्या मर्जीच्या ठिकाणी ते ट्रॅक्टर नेऊन त्यातील भरण खाली केले.

याबाबत ट्रॅक्टर चालकाने दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून दुर्गापूर पोलिसांनी त्याच्यावर कलम ३४१,३८५.२९४,३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Web Title: Shriram Sena president arrested in ransom case