शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांचे श्रद्धास्थान साठगावचे महानुभाव श्रीदत्तमंदिर

By admin | Updated: December 25, 2015 00:32 IST

चिमूर तालुक्यातील साठगाव हे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं छोटंस गाव.

चिमूर तालुक्यातील साठगाव हे नागपूर, भंडारा व चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं छोटंस गाव. या गावाचे आकर्षण म्हणजे टेकडीवर असलेले श्री दत्तात्रेय प्रभूचे मंदिर. या मंदिराच्या जागी यापूर्वी श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या विशेषाचे (पाषाणमूर्ती) झोपडीवजा मंदिर होते. श्रीदत्तात्रेय प्रभूचे निद्रास्थान असलेल्या माहुर येथे त्याकाळी मालगुजार गावंडे पाटील यांची खाचर बैलाने माहुरवारी होत असे. अशाच एका वारीमध्ये बैलाच्या खुरात माहुरचा विशेष आल्याचे म्हटले जाते. सदर विशेषाचा गावंडे पाटील यांना साक्षात्कार झाला व मिळालेल्या विशेषाची साठगाव येथील टेकडीवर प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून श्रीदत्तजयंती यात्रा येथे सुरु असल्याचे सांगितले जाते. या मंदिरामध्ये दररोज त्रिकाल पूजाअर्चा सुरु असून दर पौर्णिमेला भक्त मंडळी श्रद्धा व भक्तीभावाने पूजाअर्चा करण्यासाठी या मंदिरात येत असतात. काही भाविक मंडळी पाच दिवसांपासून तर सव्वा महिन्यापर्यंत येथे थांबतात.नवरात्रीमध्ये येथे दररोज अन्नदान केले जाते. तर मार्गशिर्ष महिन्यात भाविक सहभोजनासाठी येथे येत असतात.या पुरातन मंदिराची उभारणी चुनखडीमिश्रीत विटांनी करण्यात आली आहे. श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषावर अंत्यत वेधक व कलाकुसरयुक्त चांदीचा मुखवटा बसविलेला आहे. लाकडी रथावरील नक्षीकाम उत्कृष्ट कलेचा नमुनाच आहे. याच रथावर दरवर्षी मार्गशिष पौर्णिमेला श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषाची बँड व भजनाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात येते. गावामध्ये या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करुन श्रीदत्तात्रेय प्रभूच्या विशेषास विडाअवसर व उपहार समर्पण करण्यात येते. दत्तजयंतीपासून मार्गशिर्ष कृ. प्रतिपदा या दिवसापर्यंत येथे यात्रा असते. याप्रसंगी भजन कीर्तन, प्रवचन व गोपालकाला, महाप्रसाद वितरीत होतो. शेवटच्या दिवशी रात्री गावातील युवक मंडळी नाटकाचे आयोजन करतात. या मंदिरास तिर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा मिळाला असून मंदिर परिसरात पाहिजे त्या प्रमाणात आवश्यक सोयी सुविध उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत. सदर पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य माहुर पिठाधीश महंत मधुकरशास्त्री कवीश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली भक्त मंडळींच्या सहकार्याने विनोद रामचंद्र पाटील गावंडे यांनी सुरु केलेले आहे.समस्त गावकरी व परिसरातील सदभक्त मंडळी यांचे श्रद्धा व स्नेहाने स्व. कवडू पाटील गावंडे यांचे कुटुंब महानुभाव श्रीदत्तात्रेय प्रभू मंदिरात श्रीदत्त जयंती यात्रा महोत्सव आजही मोठ्या उत्साहाने साजरा करतात. साठगाव येथील श्रीदत्तप्रभूची महिमा पंचक्रोशीत असून बहुसंख्येने भाविक श्रीदत्तजयंती यात्रा महोत्सवाकितरा उपस्थित असतात. -संजय बोबडे , माजी सरपंच साठगाव