श्री राम मंदिर निर्मितीसाठी घराघरांपर्यंत पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:41 IST2021-02-05T07:41:01+5:302021-02-05T07:41:01+5:30
चंद्रपूर : अयोध्येत श्री रामाच्या मंदिर निर्मितीसाठी १५ जानेवारीपासून निधी संकलनाचे कार्य सुरू झाले आहे. जनतेकडून अत्यंत उत्स्फूर्त ...

श्री राम मंदिर निर्मितीसाठी घराघरांपर्यंत पोहोचणार
चंद्रपूर : अयोध्येत श्री रामाच्या मंदिर निर्मितीसाठी १५ जानेवारीपासून निधी संकलनाचे कार्य सुरू झाले आहे. जनतेकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गृह संपर्क अभियानातून विदर्भातील ४० लाख घरांपर्यंत पोहोचणार आहोत, अशी माहिती विहिंपचे विदर्भ प्रांतप्रमुख व अभियानप्रमुख गोविंद शेेंडे यांनी येथे दिली.
चंद्रपूर येथील श्री राम मंंदिर निर्माण निधी संकलनार्थ नव्याने तयार केलेल्या कार्यालयात बुधवारी ते बोलत होते.
यावेळी रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, विहिंपचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, कार्याध्यक्ष विनोद उपाध्याय, जिल्हा संयोजक सत्यनारायण खेंगर, शहर अभियानप्रमुख विजय ऐंगलवार उपस्थित होते.
शेंडे पुढे म्हणाले, अयोध्या येथील श्री राम मंदिर सरकारी पैशांनी उभारायचे नाही किंवा कुण्याएका व्यक्तीने बांधायचे नाही, तर जनतेच्या समर्पणातूनच तयार व्हावे, असे ठरविण्यात आले. त्यामुळे १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत हे निधी संकलनाचे अभियान राबवले जात आहे. त्यातही समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असावा म्हणून १ फेब्रुवारीपासून कुपनद्वारे घरोघरी संपर्क साधून निधी संकलन होणार आहे, असेही अभियानप्रमुख गोविंद शेेंडे यांनी सांगितले.