इनरव्हील क्लबतर्फे श्रावण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST2021-08-23T04:30:19+5:302021-08-23T04:30:19+5:30
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट एंजलच्या संयुक्त विद्यमानाने फ्रेंडशिप डे आणि ...

इनरव्हील क्लबतर्फे श्रावण सोहळा
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट एंजलच्या संयुक्त विद्यमानाने फ्रेंडशिप डे आणि श्रावण सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला.
मैत्रीचा धागा सदैव मजबूत राहावा, यासाठी मुख्य प्रवेशद्वारातच सर्व सभासदाना पिंक फर्स्ट लोगोचे फ्रेंडशिप बेल्ट बांधण्यात आले. त्यानंतर मंगळागौरी प्रार्थना व सामूहिक नृत्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी क्लबच्या अध्यक्ष शीतल बुक्कावार, सचिव सोनल बुक्कावार, पीडीसी वर्षा कोतपल्लीवार आदी उपस्थित होते. यावेळी गाण्याच्या तालावर मंगळागौरीचे खेळ खेळले फुगडी- झिम्मा, श्रावणावर आधारित गाणी गायली. काही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर रॅम्प वॉक घेण्यात आली. यामध्ये सर्व प्रौढ व तरुण पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर रॅम्प वॉक केले. यावेळी राधा झुल्लूरवार, सोनाली बोंनगीरवार, माधवी गुंडावार, पल्लवी रेगुडवार, सुचिता चकनलवार, जिया मामीडवार आदी उपस्थित होते.