चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुकानदार ठार; बफर क्षेत्रातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:11 IST2018-12-10T11:57:01+5:302018-12-10T12:11:00+5:30
ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात दुकानदार ठार; बफर क्षेत्रातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ताडोबाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रातील रामदेगी पर्यटन स्थळ येथे असलेल्या दुकानदारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. दुकानदार लघुशंकेसाठी दुकानाच्या मागे गेला असता वाघाने हल्ला चढवला. संदीप अर्जुन तितरे असे या इसमाचे नाव असून तो राळेगावचा होता व दुकानात काम करत होता. याआधीही असे हल्ले झाले असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.