दुकानदाराकडून तक्रारकर्त्याला मारहाण

By Admin | Updated: July 27, 2014 00:01 IST2014-07-27T00:01:48+5:302014-07-27T00:01:48+5:30

नजीकच्या नांदा येथील सरकारी स्वस्त धान्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान महिलांचे बयाण सुरू असताना खुद्द सरकारी स्वस्त धान्य

The shopkeeper assaulted the complainant | दुकानदाराकडून तक्रारकर्त्याला मारहाण

दुकानदाराकडून तक्रारकर्त्याला मारहाण

गडचांदूर : नजीकच्या नांदा येथील सरकारी स्वस्त धान्याची जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी चौकशी सुरू होती. चौकशीदरम्यान महिलांचे बयाण सुरू असताना खुद्द सरकारी स्वस्त धान्य केंद्राच्या दुकानदाराने तीन भावासह तक्रारकर्त्याला मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मनोज कुसराम याचे नांदा येथे सरकारी स्वस्त धान्य केंद्र आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना योग्य दरात धान्य मिळत नसल्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अभय मुनोत यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली. ६० ते ७० महिलांच्या बयाणानंतर दुकानदार बहुतांश बयाणात दोषी आढळले. काल जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालयाकडून चौकशी सुरू होती. ४० ते ५० महिलांचे बयाण झाले. अनेक महिलांनी दुकानदाराच्या विरोधात बयाणे दिल्यामुळे मनोज कुसराम यांनी स्वत: हस्तक्षेप करून शैलेंद्र कुसराम, प्रभाकर कुसराम, सुधाकर कुसराम, लिलाधर चटप, चौधरी आदींच्या सहकार्याने माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागणाऱ्या तक्रारकर्ते अभय मुनोत यांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले आहे. यात मुनोत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The shopkeeper assaulted the complainant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.