सावली येथील दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST2021-03-21T04:26:12+5:302021-03-21T04:26:12+5:30

सावली : येथील अभय बोरूले यांच्या वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ...

The shop at Savli caught fire | सावली येथील दुकानाला आग

सावली येथील दुकानाला आग

सावली : येथील अभय बोरूले यांच्या वेल्डिंग वर्क्स व इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सावली येथील पंचायत समितीजवळ बोरूले यांचे दुकान आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास शहरात विजेच्या कडकडाटासह सुसाट वारा व पावसाने हजेरी लावली होती. त्याच दरम्यान शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती होताच नागरिकांनी मूल व गडचिरोली येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. परंतु अग्निशमन दल वेळेवर पोहोचू न शकल्याने दुकानाची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याकरिता नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ ठरले.

मागील दोन वर्षांपासून सावली शहाराकरिता अग्निशमन दलाची मागणी करण्यात येत आहे. परंतु संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: The shop at Savli caught fire